पराभवानंतर मोहम्मद शामीला गद्दार म्हणणारांना सचिन सेहवागने फटकारले; म्हणाले…

October 26, 2021 , 0 Comments

टी -२० विश्वचषकात भारताला पाकिस्तानने १० गडी राखून पराभूत केले. विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानने प्रथमच भारताचा पराभव केला आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर नेटकरी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर भडकले असून त्याला ट्रोल करत आहे.

संतापलेले नेटकरी शमीला गद्दार, बिकाऊ, असे म्हणत ट्रोल करत आहे, या घटनेनंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. मोहम्मद शमीला शमीला ट्रोल करणे चुकीचे असून बचावासाठी पुढे आले आहेत. पाकिस्तानविरुद्ध मोहम्मद शमीने ३ ओव्हर ५ बॉलमध्ये ४३ रन दिले आणि एकही विकेट घेतली नाही. त्यामुळे त्याला ट्रोल केले जात आहे.

मोहम्मद शमीवर काही आरोपही केले जात आहे. ट्विटरवर मोहम्मद शमीच्या विरोधात अनेक गोष्टी लिहिल्या जात आहेत. त्यामुळे आता काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी मोहम्मद शमीच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. आम्ही सर्व मोहम्मद शमीसोबत आहोत, या लोकांच्या मनात घृणा भरली आहे,त्यांना कोणीच प्रेम देत नाही म्हणून ते असे करत आहे, त्यांचा विचार नको करु असे ट्विट राहूल गांधींनी केले आहे.

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही मोहम्मद शमीच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. सचिनने लिहिले की, जेव्हा आम्ही टीम इंडियाला सपोर्ट करतो, तेव्हा संघाचे प्रतिनिधित्व करणारे सर्व लोक त्यात गुंतलेले असतात. मोहम्मद शमी हा जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. त्याला फक्त एकच दिवस खराब गेला. प्रत्येक खेळाडूप्रमाणे. मी मोहम्मद शमी आणि टीम इंडियासोबत आहे.

यानंतरच माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने अशा लोकांना फटकारत ट्वीट केले आहे. वीरेंद्र सेहवागने ट्विट केले की, मोहम्मद शमीवरील ऑनलाइन हल्ल्याचा प्रकार खूपच धक्कादायक आहे. आम्ही मोहम्मद शमीच्या पाठीशी उभे आहोत, तो चॅम्पियन आहे आणि जो कोणी भारतीय संघाची टोपी घालतो त्याच्या हृदयात भारत राहतो. शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत, पुढच्या सामन्यात दाखव तुझा जबरदस्त खेळ.

हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही या मुद्द्यावर वक्तव्य केले आहे. भारत पाकिस्तान मॅचमध्ये फक्त मोहम्मद शमीला लक्ष्य केलं जात आहे कारण तो एक मुस्लिम खेळाडू आहेत, पण हे सर्व कोण परतवत आहे? असा सवाल ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
वानखेडेंवर पहीला फासा पडला, २५ कोटींच्या डिलबाबत NCB ते वरीष्ठ करणार वानखेडेंची चौकशी
रोहित-राहूलपेक्षा हा खेळाडू भारताच्या पराभवाला जबाबदार, कोहली करणार स्टार खेळाडूची हकालपट्टी?
समीर वानखेडेंवर खंडणी अपहरणाचा गुन्हा दाखल करा, आयुक्तांना पाठवलेल्या पत्रामुळे उडाली खळबळ  


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: