खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू; अँटॉप हिलच्या सीजीएस काॅलनीतील घटना

October 26, 2021 0 Comments

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई उद्यानाच्या सुशोभीकरण कामासाठी कंत्राटदाराने खोदलेल्या खड्डयातील पाण्याचा पडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना अँटॉप हिलच्या सीजीएस कॉलनीजवळ घडली. यशकुमार चंद्रवंशी (११) आणि शिवम जैस्वाल अशी मृत मुलांची नावे असून याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. ( after falling into a pit dug by a contractor for in sector 7 in of ) सीजीएस कॉलनीमधील सेक्टर ७ मध्ये उद्यान आहे. या उद्यानाच्या सुशोभिकरणाचे काम कंत्राटदाराला देण्यात आले आहे. कंत्राटदाराने उद्यानात मोठा खड्डा खणला असून तो उघडा असल्याने पाण्याने भरला आहे. काम अर्धवट असतानाही उद्यान सुरु असल्याने परिसरातील मुले खेळण्यासाठी या उद्यानात जातात. सोमवारी अनेक मुले खेळत असताना यशकुमार आणि शिवम संध्याकाळी पाचच्या सुमारास या खड्ड्यात पडले. पोहता येत नसल्याने त्यांच्या नाका तोंडात पाणी गेले. इतर मुलांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आजूबाजूला असलेल्या लोकांना सांगितले. त्यांनी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना प्राचारण केले. दोन्ही मुलांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. क्लिक करा आणि वाचा- यशकुमार आणि शिवम याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत असताना कंत्राटदाराविरुद्ध लोकांचा संताप आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांमार्फत रात्री उशिरापर्यंत सुरु होते. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: