ड्रग्ज माफिया तुमचे घरजावई आहेत का?’, नवाब मलिकांच्या आरोपांवर राम कदम भडकले

October 07, 2021 , 0 Comments

मुंबई। एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी (२ ऑक्टोबर) ड्रग्ज जप्त केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसाह आठ जणांना एनसीबीने अटक केली आहे.

व या प्रकरणात आबेक राजकीय नेत्यांनी देखील उडी घेतली आहे. बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत थेट एनसीबी अधिकारीच खोटे असल्याचा आरोप केला आहे.

कारवाई करणारे एनसीबीचे अधिकारी नसून भाजपाचेच लोक असल्याचा त्यांनी आरोप केला. व त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. दरम्यान मालिकांच्या आरोपांनंतर आता भाजप नेते राम कदम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या साहसाने क्रूझवर कारवाई करत ड्रग्ज आणि काही लोकांना रंगेहाथ पकडलं. संपूर्ण देशात त्यांचं कौतुक होत आहे. पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकारचे मंत्री पत्रकार परिषद घेऊन ही सर्व कारवाई ढोंग आहे असं म्हणून त्या अधिकाऱ्यांचा अपमान करत आहेत” असं राम कदम म्हणाले.

“जे अधिकारी ड्रग्ज माफीयावर कारवाई करतात ते ढोंगी, पण ड्रग्य माफीया चांगले. काय म्हणायच काय? महाराष्ट्र सरकारची मती कुठे गेलीये? ड्रग माफिया या तीन पक्षांच्या सरकाराचे कोण लागतात? असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

पुढे ते म्हणाले आहेत की, रिया चक्रवर्तीच्यावेळी सुद्धा तिच्या व्हॉट्स अॅप चॅटवरील ड्रग्जशी संबंधित संभाषण ६६ दिवस का लपवलं? कोण लागतात हे ड्रग्ज माफीया? घरजावई आहेत का? अस म्हणत राम कदम यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल चढवला आहे.

पुढे म्हणाले, अप्रत्यक्षपणे महाराष्ट्र सरकार ड्रगमाफियांचे समर्थन करत आहेत. का मागे आम्ही पाहिली तशी कोट्यवधी रुपयांची वसुली या ड्रगमाफियांकडून सरकार करत आहे? याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील. जे अधिकारी कारवाई करतील, त्यांच्यावर तुम्ही तुटून पडणार, राजकारणात खाली पडाल पण किती पडाल यालाही मर्यादा हव्यात.

असे अनेक प्रश्न उपस्थित करून राम कदम यांनी या प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावी लागतील असे राम कदम म्हणाले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारकडून राम कदम यांना उत्तर मिळणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
भाऊ आर्यनच्या अटकेनंतर सुहाना खानही घाबरली; स्वत:ला वाचवण्यासाठी उचललं ‘हे’ पाऊल 
शमिता शेट्टीचे राकेश बापटसोबत फ्लर्ट करतानाचे व्हिडीओ व्हायरल; राकेशनेही कबुली देत दिली ‘ही’ प्रतिक्रीया 
पहिले हवन केले, नंतर मुंडन केले; भाजप आमदाराने हटके स्टाईलमध्ये सोडली भाजप
सोनालीचा टॉपलेस फोटो पाहून नेटकरी म्हणाले, बाई तुम्हाला आवडते तर तुमच्यापर्यंत ठेवा, सार्वजनिक का करता?


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: