फालतू आणि मूर्खपणा करू नका, हा कुणाच्यातरी आयुष्याचा प्रश्न आहे; आर्यनच्या अटकेवर अभिनेत्री भडकली
मुंबई । गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी अटकेत आहे. त्याला अनेकदा जामीन नाकारण्यात आला आहे. यामुळे अनेकांनी शाहरुख खानला पाठिंबा दिला आहे. यावर आता बॉलिवूड अभिनेत्री कुब्रा सैतने देखील प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे.
ती म्हणाली, तुमची प्रत्येक गोष्ट जेव्हा कुणीतरी जज करत असते तेव्हा आयुष्य जगण्याची ती सर्वात कठीण आणि भयंकर वेळ असते. प्रत्येकजण जराही विचार न करता सत्याची पडताळणी न करता आपला निर्णय सांगत असतो, यामुळे अनेकांचे मोठे नुकसान होत असते. लोकांसाठी सत्य बदलले जाऊ शकत नाही.
केवळ मनोरंजनासाठी सत्य बाजूला ठेवून अफवा पसरवू लागतात. हे आजच नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून घडत आले आहे. ती म्हणाली हे खूपच दूर्दैवी आहे. त्यांचीही कुटुंब आहेत आणि त्यांची स्वतःची प्रतिष्ठा आहे, स्वतःचं जीवन आहे.
आपल्याकडे असलेल्या माध्यमांचा वापर जबाबदारीने करा. फालतू आणि मूर्खपणा करू नका हा कुणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे, असे म्हणत तिने एकप्रकारे शाहरुख खानला पाठिंबा दिला आहे. सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमध्ये कूक्कू ही भूमिका साकारत कुब्राने लोकप्रियता मिळवली होती.
कुब्रा सोशल मीडियापासून दूर राहणच पसंत करते. मात्र आता आर्यन प्रकरणात देखील तिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने ट्विटरचा निरोप घेतला होता. आता बातम्या पाहणं देखील तिने बंद केल्याचे ती या मुलाखतीत म्हणाली.
आर्यन खानला अटक केल्यापासून अनेक बॉलीवूड कलाकारांनी त्याला पाठिंबा दिला आहे. अनेकजण त्याला धीर देत असून सोशल मीडियावर आवाज उठवला जात आहे. मात्र अजूनही आर्यनला जामीन मंजूर करण्यात आला नाही.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: