पाकिस्तानच्या विजयानंतर शोएब अख्तरने हरभजनसिंगला डिवचले, म्हणाला हरभजनसिंग तू….

October 25, 2021 , 0 Comments

टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताचा मोठा पराभव केला आहे. रविवारी झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून भारताला १० गडी राखून पराभव पत्करावा लागला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १५१ धावा केल्या.

पाकिस्तानने या धावांचा पाठलाग करताना १८ षटकांत एकही विकेट न गमावता इतिहास रचला. मोहम्मद रिझवान (७९) आणि बाबर आझम (६८) यांनी पाकिस्तानला सहज विजय मिळवून दिला. यासह पाकिस्तानने टी-20 विश्वचषकातील पराभवाची मालिका खंडित केली आहे.

या सामन्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने आता टीम इंडियाला डिवचले आहे. त्याने हरभजनसिंगवर निशाणा साधला आहे. अख्तरने ट्विट करून विचारले की, हरभजन सिंग तू कुठे आहेस? असा प्रश्न त्याने विचारला आहे.

तसेच हरभजनसिंगने या सामन्यापूर्वी म्हटले होते की, भारताला पाकिस्तानविरुद्ध सहज विजय मिळायला हवा. मात्र पाकिस्तानच्या विजयानंतर शोएब अख्तरने हरभजनला उत्तर दिले आहे. अख्तरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि हरभजनला विचारले की त्याला अजून वॉकओव्हरची गरज आहे का? असेही तो म्हणाला.

भारतीय संघाने टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कधीही १० गडी राखून पराभव पत्करला नव्हता, पण आज हा विक्रमही त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या सामन्यात पाकिस्तानने कुठेच चूक केली नाही.

विराट कोहली (५७) आणि ऋषभ पंत (३९) यांच्या दमदार खेळीमुळे भारताने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १५१ धावा केल्या. कर्णधार कोहलीने आणि ऋषभ पंतने चौथ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी करत भारतीय डाव सावरला. भारताच्या या पराभवानंतर चाहते खुप दुखी झाले आहेत.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: