बिगबॉसमध्ये गेल्यामुळे शिवलीला पाटलांच्या कीर्तनाला वारकऱ्यांचा विरोध; आयोजकांवर गुन्हा दाखल
बुलडाणा। जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने शिवलीला पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या कोरोना विषाणूने विळखा घातला आहे. त्यामुळे सर्व कार्यक्रमावर राज्य सरकारने कडक नियम घालण्यात आले आहेत.
दरम्यान, शिवलीला पाटील यांच्या कीर्तनास जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने विरोध दर्शवला. पण, आयोजकांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत कीर्तनाचे आयोजन केले. व प्रचंड गर्दी झाली. दुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना हे आयोजन महागात पडले.
याप्रकरणी तिघांविरुद्ध बुलडाणा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणातील देऊळगाव मही येथील राजमाता जिजाऊ दुर्गा मंडळ यांच्या वतीने ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले.
मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी जमवू नये, असे आदेश बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी दिलेले असताना सदर कीर्तनास भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण या कीर्तनाला दोनशेच्यावर महिला पुरुषांनी गर्दी केली.व त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, देऊळगाव मही येथील मंडळातर्फे आयोजित सदर कीर्तनाच्या कार्यक्रमास दोनशेच्यावर महिला पुरुषांनी गर्दी केली.
यासंदर्भात पोलिस उपनिरीक्षक किरण खाडे यांनी सरकारतर्फे पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून मंडळाचे आयोजक संदीप विजय राऊत वय २५, गणेश साहेबराव गोरे व किशोर शालिकराम पोफळकर सर्व राहणार देऊळगाव मही यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.
शिवलीला पाटील यांनी बिग बॉसच्या घरात एण्ट्री केल्यानंतर त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम देऊळगाव मही येथे होणार असल्याचा प्रचार झाल्यानंतर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने बिग बॉस फेम शिवलीला पाटील यांचा निषेध करीत सदर कीर्तनाचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी आयोजकांकडे केली.
बिग बॉस हा शो पाश्चात्य संस्कृतीचे दर्शन घडविणारा असून यामध्ये एन्ट्री करून हरीभक्त पारायण या सन्मानाचा अवमान झाला असल्याची भूमिका वारकरी संप्रदायाने व्यक्त करीत सदर कीर्तनाच्या कार्यक्रमास विरोध दर्शविला. तरीही आयोजकांनी मात्र माघार घेतली नाही.मात्र आयोजकांनी कीर्तनाचे आयोजन केले व व त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
RCB ला धक्का देत KKR ची फायनलमध्ये धडक, विराट कोहलीच्या पदरात पुन्हा एकदा निराशा
आर्यन खानच्या समर्थनार्थ राज बब्बर मैदानात; म्हणाले, योद्ध्याचा मुलगा आहे, पलटवार नक्की करणार
ऐकावं ते नवल! या बारमध्ये दारू नाही तर दुध पिण्यासाठी होते गर्दी, मोदींनी केली होती मोठी मदत
सामना संपल्यावर असे काय की धोनीची पत्नी साक्षीने ढसाढसा रडत मुलगी झीवाला मारली मिठी; जाणून घ्या..
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: