'मैं अकेला ही चला था, लोग जुडते गए और...'; निकालांवर पटोले म्हणाले...
मुंबई: राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकांची आज मतमोजणी सुरू असून आतापर्यंतचे निकाल पाहता काँग्रेसने मुसंडी मारल्याचे दिसत आहे. त्यावर प्रदेशाध्यक्ष यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे हा विजय कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा विजय आहे', असे नाना पटोले म्हणाले. ( ) वाचा: 'मैं अकेला ही चला था, लोग जुडते गए और कारवाँ बनता गया', असा शेर उच्चारत नाना पटोले यांनी आजच्या निकालांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपवर तोफ डागलीच शिवाय पुन्हा एकदा काँग्रेसला राज्यात नंबर एकचा पक्ष बनवण्याचा निर्धार बोलून दाखवला. 'काँग्रेस हा पक्ष खऱ्या अर्थाने तळागाळातला पक्ष आहे. जनसामान्यांचा पक्ष आहे. कुणाला तरी तिसऱ्या माणसाला समोर उभं करायचं आणि मग तिहेरी लढतीत सहज निवडून यायचं, असलं राजकारण काँग्रेसने कधीही केले नाही. म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रात काँग्रेस हाच एक नंबरचा पक्ष होईल', असे पटोले म्हणाले. वाचा: 'मी ज्या दिवशी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला त्याचदिवशी राज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष बनवणार, असं जाहीर केलं आणि त्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे', असा दावाही पटोले यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुक असतात आणि पक्ष हा कार्यकर्त्यांच्या भरवशावरच मोठा होत असतो, हे मानणारा मी कार्यकर्ता असून मी घेतलेल्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये जी हिंमत आली त्याचेच फलीत आज झाले आहे. आमची पुढची वाटचालही अशाचप्रकारे राहणार आहे', असे पटोले म्हणाले. 'मला पाठीमागून वार करता येत नाहीत. माझी लढाई मी नेहमीच समोरून लढलो. माझा आतापर्यंतचा इतिहास असाच आहे. मी लपून छपून काहीही केलेले नाही आणि करणार नाही', असा टोलाही महाविकास आघाडीतील आणि काँग्रेस या मित्रपक्षांना त्यांनी लगावला. वाचा: भाजपचे उलटे दिवस सुरू झाले! काँग्रेसच्या काही चुका झाल्याही असतील पण त्या दुरुस्त करून आम्ही जनतेपुढे जाऊ. त्याची सुरुवात आम्ही केली आहे. सगळं काही आम्ही सर केलं असं लगेच म्हणणार नाही पण त्यादिशेने वाटचाल सुरू झाली आहे, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्याच्या तोंडाला लागण्याची गरज नाही. आम्ही लोकशाही मानणारे आहोत, आम्ही काही ईडी आणि सीबीआय चौकशा लावणारे लोक नाही. आमच्याविरोधात बोललात तर तुमचं चॅनेल बंद करून टाकू, तुमच्यामागे ईडी, सीबीआय लावू, ही आमची प्रवृत्ती नाही, असे सांगताना भाजपचे उलटे दिवस सुरू झाले आहेत, असे पटोले म्हणाले. भाजपचं शेतकरी-कामगार विरोधी असंविधानीक धोरण आणि सरकारच्या देश विकण्याच्या वृत्तीला कॉंग्रेसच थांबवू शकते हे जनतेचं मत आहे, हे आता दिसून येत आहे, असेही पटोले यांनी सांगितले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: