आर्यनविरुद्ध ड्रग्जची केसच होऊ शकत नाही!; वकिलांनी केला 'हा' दावा

October 27, 2021 0 Comments

मुंबई: प्रकरणी अभिनेता याचा मुलगा याच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील यांनी आज आर्यनसाठी युक्तिवाद केला. ते आर्यनचे तिसरे वकील ठरले. याआधी ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई यांनीही आर्यनची बाजू मांडलेली आहे. ( ) वाचा: आर्यनच्या जामिनासाठी मुकुल रोहतगी यांनी आज पुन्हा एकदा संपूर्ण घटनाक्रम सांगितला व आर्यनच्या विरोधात केसच होऊ शकत नाही, असा दावा केला. त्यासाठी एनसीबीच्या कारवाईचाच तपशील रोहतगी यांनी समोर ठेवला. सुप्रीम कोर्टातील याचिकांचाही दाखला यावेळी रोहतगी यांनी दिला. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना आधीच माहिती मिळाली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी क्रूझ टर्मिनलवर आर्यन आणि यांना हटकले पण त्यात झडतीचा मुद्दा महत्त्वाचा आहे. आर्यनकडून तिथे काहीच हस्तगत करण्यात आलेले नाही. अरबाजच्या शूजमधून अमलीपदार्थ हस्तगत केले असा एनसीबीचा दावा आहे आणि त्यावर त्याचे वकील उत्तर देतील पण आर्यनकडून काहीच हस्तगत केलेले नाही, त्याची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे रोहतगी यांनी नमूद केले. सुप्रीम कोर्टात आम्ही अनेक याचिकांमध्ये हा वादाचा मुद्दा मांडला की, कोणत्याही विशेष कायद्यान्वये असलेल्या अधिकारांतर्गत असलेले अधिकारी जेव्हा आरोपीचा जबाब नोंदवतात तेव्हा त्यांना पुरावे कायद्यातील कलम २५ लागू होते. ते इथेही लागू होतेच, याकडे रोहतगी यांनी लक्ष वेधले. वाचा: 'ते' व्हॉट्सअ‍ॅप चॅट २०१८, २०१९ मधील आर्यनला ड्रग्ज सेवन करताना पकडण्यात आलेले नाही. त्याच्याकडून काहीच हस्तगत केलेले नाही. फक्त अरबाजसोबत तो तिथे गेला होता. त्यात अरबाजकडे ड्रग्ज होते हे आर्यनला माहीत होते, असे एनसीबीचे म्हणणे आहे तेच चुकीचे आहे. अरबाजवरील आरोप खरे मानले तरी त्याच्याकडे फक्त ६ ग्रॅम चरस आढळले, त्याआधारे आर्यनला गजाआड ठेवले जाऊ शकत नाही. एनसीबीने दुसरा आधार घेतलाय तो ड्रग्ज तस्करीत सहभाग असल्याच्या आरोपाचा पण आर्यनला कलम २७ लावले गेलेले नाही. सर्वसाधारण आरोप लावत कटात सहभाग असल्याचे एनसीबी म्हणते आहे. आर्यनचे व्हाट्सअ‍ॅप चॅट्स त्यांनी दाखवले. २०१८, २०१९ वगैरे सालातील हे चॅट आहे. क्रूझ टर्मिनल विषयी, या प्रकरणाविषयीचे काहीच चॅट्स त्यात नाहीत. आपण असे गृहित जरी धरले की, आर्यन आणि त्याचे मित्र मंडळी रेव्ह पार्टीसाठी जमणार होते पण ती पार्टीच झालेली नाही. एनसीबी अधिकाऱ्यांनी टर्मिनलवरच हटकले आणि त्यांना पकडले. ड्रग्ज सेवन करताना पकडले वगैरेचाही प्रकार झालेला नाही. त्यामुळे आर्यनच्या विरोधात केसच होत नाही, असा दावा रोहतगी यांनी केला. अरबाजबाबत त्याचे वकील उत्तर देतील पण या सगळ्यात आर्यनला अटक करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही रोहतगी म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: