मलिक यांच्या गौप्यस्फोटानंतर 'तो' भाजप कार्यकर्ता आला समोर; म्हणाला...
मुंबई: मुंबईजवळ समुद्रात क्रूझवरील पार्टीवर छापा टाकला तेव्हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या टीममध्ये खासगी व्यक्तींचाही समावेश होता, असा गंभीर आरोप मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी केला आहे. हे आरोप लगेचच एनसीबीने फेटाळले असताना आता ज्या खासगी व्यक्तींची नावे घेतली गेली आहेत त्यापैकी हा समोर आला असून त्याने आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. मलिक यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचेही भानुशालीने सांगितले. ( ) वाचा: क्रूझवरील कारवाईवेळी आपण एनसीबीच्या टीमसोबत होतो हे मनीष भानुशाली याने मान्य केले आहे. मात्र, त्याची पार्श्वभूमी सांगताना नवाब मलिक यांचे आरोप त्याने फेटाळले आहेत. भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असल्याचे मलिक म्हणाले होते. मात्र मी भाजपचा सामान्य कार्यकर्ता असून माझ्याकडे कोणतेही पद नसल्याचे भानुशाली याने स्पष्ट केले. क्रूझवरील पार्टीबाबतही भानुशाली याने महत्त्वाचे दावे केले. वाचा: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती मला मिळाली होती. ही बाब गंभीर असल्याचे माझ्या लक्षात आले व एक सजग नागरिक म्हणून मी याबाबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. १ ऑक्टोबर रोजी याबाबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मी सांगितले. त्यावर २ ऑक्टोबर रोजी मला त्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात भेटायला बोलावले. त्यानुसार मी तिथे जाऊन माझ्याकडचा सर्व तपशील त्यांना दिला. एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक त्यावेळी तिथे उपस्थित नव्हते. काही वेळाने ते आले तेव्हा त्यांनाही सदर अधिकाऱ्याने ही माहिती दिली, असे भानुशाली याचे म्हणणे आहे. वाचा: क्रूझवर बोर्डिंगची वेळ १२ वाजताची होती. त्यामुळे एनसीबीची टीम लगेचच निघाली. मी माहिती दिलेली असल्याने त्यांनी मलाही सोबत येण्यास सांगितले. त्यानुसार मी त्यांच्यासोबत गेलो. तिथून पररतानाही मी त्यांच्यासोबत होतो. तपासाचा भाग म्हणून त्यांनी मला सोबत ठेवले होते, असेही भानुशाली याने नमूद केले. खरंतर ड्रग्ज पार्टीबाबत माहिती देऊन मी देशसेवेचं काम केलं आहे. ड्रग्जचं रॅकेट पकडलं जावं म्हणून ही माझी तळमळ होती. असे असताना मंत्री नवाब मलिक हे मला दोषी म्हणत असतील तर ते योग्य नाही. मी यासाठी त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा करणार आहे, असे भानुशाली याने सांगितले. मी दिलेल्या माहितीनंतर ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. आता मलिक यांनी माझे नाव समोर आणल्याने ड्रग्ज माफियांकडून माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यासाठी मी महाराष्ट्र सरकारकडे संरक्षणाची मागणी करणार असल्याचेही भानुशाली म्हणाला. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: