ऐन दिवाळीत एसटी कामगार संपाच्या तयारीत, केली 'ही' मोठी मागणी

October 25, 2021 0 Comments

अहमदनगर: राज्य परिवहन महामंडळ सतत तोट्यात असल्याने कर्मचाऱ्यांनाही त्याचा फटका बसतो. त्यामुळे एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. यासह अन्य मागण्यांसाठी एक नोव्हेंबरला कामगारांचे मतदान घेऊन संपाचा निर्णय घेण्यात येणार आहे, असा इशारा शेवगाव येथे झालेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा कामगार मेळाव्यात देण्यात आला. ( Warn of Strike) नगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा कामगार मेळावा झाला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, जिल्हा सरचिटणीस दिलीप लबडे यांच्यासह संघटनेचे राज्यस्तरीवरील पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांनी हा इशारा दिला आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने निर्णय घेतले नाहीत, तर एक नोव्हेंबरला संपासंबंधी कामागारांचे मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतर लोणावळ्यात बैठक घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन संप पुकाराला जाईल, असे यावेळी अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. वाचा: शिंदे म्हणाले, ‘एसटी कामगारांच्या प्रश्नांवर आम्ही सरकारसोबत वेळोवेळी वाटाघाटी केल्या आहेत. तरीही सरकार एसटी तोट्यात असल्याचे कारण देत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतवाढ देत नाही. करोनाच्या संकट काळात सेवा बजावताना ३०६ एसटी कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला. आर्थिक विवंचनेतून आतापर्यंत २६ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशी बिकट परस्थिती असताना सरकार एसटी तोट्यात असल्याचे कारण देत मागण्या मान्य करून पूर्णत्वास नेत नाही. मात्र, एसटी तोट्यात असण्याला कर्मचारी नव्हे, तर सरकारचे धोरण कारणीभूत आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याशिवाय पर्याय नाही. हा पर्याय घेऊन आम्ही पुढे आलो आहोत. ३० नोव्हेंबरपर्यंत प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील सर्व एसटी कामगार संघटना ऐन दिवाळीच्या तोंडावर संपाच्या पवित्र्यात आहेत. मात्र आता एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि राज्य सरकारची मुद्रा मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही.’ या मेळाव्यास शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले, जिल्हा सरचिटणीस दिलीप लबडे यांच्यासह राज्य आणि जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: