'त्या' पंटरला लाच मागताना रंगेहात पकडण्यासाठी रचला सापळा, पण ...

October 29, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, जळगाव वाहन हस्तांतरणासाठी अधिकृत फी भरल्यानंतरही २०० रुपयांची मागणाऱ्या पंटरविरुद्ध गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या पंटरला रंगेहात अटक करण्यासाठी ट्रॅप लावून देखील तो बेपत्ता झाल्याने लाच मागितल्याच्या रेकॉर्डींगवरुन ही कारवाई करण्यात आली. (a case has been registered against the person who demanded even after paying the fee for ) भुसावळ येथिल प्रशांत जगन्नाथ भोळे उर्फ पप्पु भोळे (रा. भुसावळ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोळे हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांचा पंटर असल्याचे तक्रारदार वाहन प्रतिनिधी गणेश कौतीकराव ढेंगे (वय ५९, रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी) यांनी फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी गणेश ढेंगे हे ६ ऑक्टोबर रोजी जितेंद्र सोनार यांची दुचाकी (एमएच १९ सीसी ७७००) हस्तांतरणासाठी आरटीओ कार्यालयात गेले होते. त्यांनी शासकीय शुल्क ४०० रुपये भरले. यानंतर भोळे याने आणखी ३०० रुपये लागतील असे सांगीतले. हे ३०० रुपये अधिकाऱ्यांच्या सह्यांपोटी लागतील असे सांगीतले होते. क्लिक करा आणि वाचा- ढेंगे यांनी याबाबत ८ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे जाऊन लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार केली. त्यानुसार ११ रोजी भोळेला रंगेहात अटक करण्यासाठी ११ रोजी पथक जळगावात पोहोचले. यावेळी त्यांनी भोळे याला गाठुन पैशांबाबत बोलणी केली. ‘अॅक्चुली खरी गोष्ट सांगा, भाऊसाहेबांचे किती असे सांगा’ अशी विचारणा केली असता भोळेने सांगीतले की, ‘२० रुपये भाऊसाहेब आणि साहेबाच्या स्टारचे १००, आणि ज्युनिअरचे ५० रुपये असे १७० रुपये आणि आपला पोरगा फी घेतो ३० रुपये’ असे २०० रूपये भोळेने लाच मागीतली. भोळेच्या सांगीतल्यानुसार, ढेंगे अकील नावाच्या मुलाकडे गेले. दोघांमध्ये पैशांबाबत बोलणी झाली. २०० रुपये नंतर देणार असल्याचे ढेंगेंनी सांगीतले. यांनतर ढेंगे पुन्हा एसीबीच्या पथकाकडे आले होते. क्लिक करा आणि वाचा- भोळे व अकील याांच्याशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डींग झालेले होते. त्यावरुन भोळे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. काही वेळातच ढेंगे प्रत्यक्ष लाच देण्यासाठी गेले. परंतु, नंतर भोळे भेटला नाही. यानंतर पुन्हा एकदा आरटीओ कार्यालयात सापळा रचण्यात आला, यावेळी देखील भोळे भेटला नाही. भोळेला कारवाईचा संशय आल्यामुळे तो आता पैसे घेणार नाही. त्याने आरटीओ लोही यांचा खासगी व्यक्ती म्हणून २०० रुपयांची लाच मागीतल्याची तक्रार ढेंगे यांनी केली आहे. त्यानुसार गुरुवारी भोळेच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: