ओवैसी म्हणाले प्रधानमंत्री आवास योजनेत मुस्लिमांवर अन्याय, योगींनी दिले सडेतोड प्रत्यूत्तर

October 01, 2021 , 0 Comments

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. असे असताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली होती. यामुळे आता योगींनी देखील त्यांना उत्तर दिले आहे.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले होते की, योगी सरकार मुस्लिमांच्या विरोधात भेदभाव करत आहेत. मुस्लिमांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देखील दिला जात नाही. या योजनेत तुम्ही कोणाला घर दिले १० नावे सांगा असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता. उत्तर प्रदेश मध्ये मुस्लिम शिकत नाही, याला जबाबदार कोण, असेही ते म्हणाले.

यावर योगींनी जोरदार उत्तर दिले आहे. योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर देत म्हटले, की ‘मोदीजींचा संकल्प सबका साथ सबका विकास आहे. पीएम आवास योजनेचा लाभ कुणाच्या चेहऱ्याकडे पाहून दिला जात नाही. ते म्हणाले, महिलांसाठी घर बनवण्याचे काम मोदीजींनी केले आहे.

पूर्वी मुलींबाबत भेदभाव होता, आमचे सरकार आल्यानंतर भेदभाव संपुष्टात आला. आमच्या सरकारने मुलींच्या लग्नासाठी एक योजनाही बनवली आहे. तसेच ७५१ कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. लोकांना आयुषमान योजनेचा लाभ दिला जात आहे.

उन्नावमध्ये अनेक योजनांचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, मागील सरकारने कंवर यात्रा काढू दिली नाही. आधीच्या सरकारने कृष्ण जन्माष्टमीवरही बंदी घातली होती. मागील सरकारने म्हटले होते की, डीजे वाजवले तर कंवर यात्रेमध्ये दंगल होईल, आम्ही कंवर यात्रेतील डीजेची बंदी काढून टाकली आणि दंगल झाली नाही.

दंगलखोरांच्या सात पिढ्या त्याची भरपाई करून थकतील. राज्यात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे हे मतदान आपल्याकडे वळवण्यासाठी आता अनेक पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: