“अजित पवार यांना वाचवण्यासाठी हे सुरु आहे, शरद पवारांना आणि मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे”

October 29, 2021 , 0 Comments

ड्रग्स प्रकणामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकणात सतत नवनवीन खुलासे होत आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिकांकडूनही एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप होत आहे. या गंभीर आरोपांमुळे राज्याचे राजकारण तापताना दिसून येत आहे.

या प्रकरणामुळे भाजप नेत्यांकडून नवाब मलिकांसह महाविकास आघाडी नेत्यांवरही टीका केली जात आहे. आता या प्रकरणावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनही प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिकांच्या मागे शरद पवार आणि मुख्यंत्री उद्धव ठाकरे असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावरुनच नवाब मलिक समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांची माहिती मिळवत आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नीशी माझं बोलणं झालं आहे. त्या आणि त्यांचे सासरे मला भेटायला येणार आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

जात काढली जाते, बाप काढला जातो, हे साफ चुकीचे आहे. ठाकरे सरकार चुकीचं वागतंय. शरद पवार आणि उद्धव
ठाकरे यांना हे शोभत नाही. मलिक ज्याप्रकारे चिखलफेक करत आहे, ते साफ चुकीचं आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

नवाब मलिकांनी कोर्टात गेलं पाहिजे, कोर्ट काय निर्णय घेईल तो घेईल. तुम्ही लोकांची दिशाभुल का करताय? तुमचे घोटाळे बाहेर काढले, त्यामुळे लक्ष विचलित करण्यासाठी समीर वानखेडेंना टार्गेट केलं जातंय, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे.

समीर वानखेडे हे प्रकरण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची ट्रिक आहे, त्यांना लाज वाटायला हवी. एका अधिकाऱ्याची जात काढली जाते. त्याच्या बायकोची इज्जत काढली जाते. महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे काढण्यासाठीच समीर वानखेडेची चर्चा सुरु आहे, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. यावेळी अजित पवारांना वाचवण्यासाठी हे प्रकरण सुरु करण्यात आलं आहे, असा दावाही सोमय्या यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
समीर वानखेडे यांच्याविरोधात मुंबई पोलिस करताय चौकशी; जाणून घ्या काय-काय झालं आतापर्यंत….
आर्यनला जामीन मिळवून देणारे वकील मुकूल रोहतगी आहेत तरी कोण? फी ऐकूनच धक्का बसेल
आर्यन खानच्या जामीनात ‘या’ मंत्रालयाने बजावली महत्वाची भूमिका; वकील रोहतगींनीच केला खुलासा


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: