समीर वानखेडे यांना पुन्हा नवाब मलिक यांचे आव्हान; 'त्या' दाव्यावर ठाम
मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांचे सर्व आरोप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय संचालक यांनी फेटाळले आहेत. आपण मालदीवला रितसर परवानगी घेऊन गेलो होतो मात्र दुबईला गेलो नव्हतो, असे वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे. एनसीबीनेही वानखेडे मालदीवला गेले होते, असे म्हटले आहे. नेमके त्यावरच बोट ठेवत मंत्री मलिक यांनी नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ( ) वाचा: 'मंत्री मलिक यांनी केलेले आरोप खोटे आहेत. माझी बहीण हिच्यासोबत मी कधीही किंवा मालदीवला गेलेलो नाही. सेवेत रुजू झाल्यानंतर माझा एकही दुबई प्रवास झालेला नाही. मी जो मालदिवला गेलो होतो तो माझ्या खर्चाने गेलो होतो. त्यासाठी मी रितसर सुट्टी घेतली होती', असे नमूद करत समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांचे आरोप फेटाळले. माझ्यावर, माझ्या दिवंगत आईवर, निवृत्त सैनिक असलेल्या माझ्या वडिलांवर, माझ्या बहिणीवर मलिक गेले १५ दिवस खोटे आरोप करत आहेत. त्यांना मी कायदेशीर मार्गाने उत्तर देणार आहे, असेही वानखेडे यांनी सांगितले. त्यानंतर मलिक यांनी लगेचच माध्यमांकडे प्रतिक्रिया देत वानखेडे यांना आव्हान दिले आहे. वाचा: 'समीर वानखेडे हे दुबईला गेल्याचा इन्कार करत आहेत. एनसीबीच्या प्रेस नोटमध्येही वानखेडे रितसर रजा घेऊन मालदीवला गेले होते मात्र दुबईला जाण्यासाठी त्यांनी कोणताही अर्ज केलेला नव्हता, असे म्हटले आहे. असे असताना खुद्द वानखेडे यांची बहीण मात्र ते मालदीवला आले नव्हते असे म्हणते आहे. हा विरोधाभास नाही का?', असा सवाल मलिक यांनी केला. ट्वीटरवर मी जो फोटो पोस्ट केला आहे त्यात टाइमलाइन स्पष्टपणे दिसत आहे. तो फोटो दुबईतील हॉटेलमधला आहे आणि १० डिसेंबर २०२० रोजी पोस्ट करण्यात आलेला आहे, असे मलिक यांनी निदर्शनास आणून दिले. माझ्यावर कायदेशीर कारवाई करणार असे वानखेडे म्हणत आहे. त्यावर माझी हरकत असण्याचे कारण नाही. आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे आणि कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा त्यांना आणि मलाही अधिकार आहे, असे मलिक म्हणाले. या सर्वच गोष्टी येत्या काळात योग्य ठिकाणी पोहचतील आणि जे काही सत्य आहे ते समोर येईल, असेही मलिक यांनी नमूद केले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: