एकनाथ खडसे यांना तूर्त दिलासा; पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
मुंबई: कथित प्रकरणात विशेष कोर्टाने काँग्रेसचे नेते व माजी मंत्री यांच्या पत्नी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज फेटाळला आहे. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. त्याचवेळी एकनाथ खडसे यांना प्रकृतीच्या कारणास्तव तूर्तास दिलासा देऊन कोर्टाने पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे. ( Eknath Khadse ) वाचा: एकनाथ खडसे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या ते मुंबई रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे ते आज सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. खडसे यांना अजून काही दिवस रुग्णालयात राहावे लागणार आहे, असे सांगत त्यांच्या वकिलांनी न्यायालयात हजर राहण्यासाठी आणखी वेळ मिळावा, अशी विनंती केली. त्यावर खडसे यांची ही विनंती न्यायालयाने मान्य केली आहे व या प्रकरणात पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे. वाचा: मंदाकिनी खडसे यांना धक्का पुणे येथील भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे. याच प्रकरणात एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसे यांच्यावरही ईडीकडून आरोप ठेवण्यात आलेले आहेत. या दोघांवरही अटकेची टांगती तलवार असतानाच आज पीएमएलए विशेष कोर्टात मंदाकिनी खडसे यांना मोठा धक्का बसला. मंदाकिनी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज पीएमएलए विशेष कोर्टाने फेटाळला आणि त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: