घागऱ्यांमध्ये लपवून ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येणार होते करोडोंचे ड्रग्स, एनसीबीने केला भांडाफोड
ड्रग्स विक्रेते एका ठिकाणाहून दुसरीकडे ड्रग्स पोहोचवण्यासाठी काय युक्ती करतील सांगता येत नाही. अशीच युक्ती कर्नाटकातील तस्करांनी घागऱ्याला बनवलेल्या डिझाईन्समध्ये ड्रग्सची पाकिटे लपवली होती. NCB बंगळुरू युनिटने 3 घागऱ्यामध्ये लपवून ऑस्ट्रेलियाला पाठवल्या जाणारे 3 किलो अंमली पदार्थ जप्त केले आहे.
एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या ड्रग्सची किंमत कोटींमध्ये सांगितली जात आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की NCB मुंबई, बेंगळुरू, चेन्नई येथे ड्रग्जविरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जात आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे प्रकरण मुंबईत चर्चेत आहे.
NCB बेंगळुरूचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या टीमने ऑस्ट्रेलियाला पाठवले जाणारे एक पार्सल रोखले आणि सुमारे तीन किलो पांढरे क्रिस्टल ड्रग्स जप्त केले आहेत. हे स्यूडोफेड्रिन असल्याचे मानले जाते आणि 3 घागऱ्यांच्या फॉल लाइन एरियामध्ये हे ड्रग्स लपवण्यात आले होते.
ड्रग्स अतिशय चांगल्या प्रकारे लपवलेले होते आणि त्यांना शोधणे कठीण होते. घागऱ्याच्या फॉल लाईनचा प्रत्येक शिलाई उघडल्यानंतर लपवलेले ड्रग्स सापडले आहेत. पार्सल नरसापुरम, पश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश येथून बुक केले होते आणि ते ऑस्ट्रेलियाला पाठवले जाणार होते.
बुकिंग काउंटरवर झटपट तपासणी केली गेली आणि यामुळे चेन्नईमध्ये माल पाठवणाऱ्याची ओळख पटली. एनसीबी चेन्नईच्या टीमने 2 दिवस तपास केला आणि पार्सल पाठवणाऱ्याचा खरा पत्ता ओळखला आणि त्याला 22 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे पकडले. पार्सल पाठवण्यासाठी बनावट पत्ते आणि कागदपत्रांचा वापर केल्याचे आढळून आले. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.
दरम्यान, मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सध्या अनन्या पांडेची चौकशी होत आहे. तिला सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. एनसीबीने असा खुलासा केला आहे की तिच्यामध्ये आणि आर्यनमध्ये ड्रग्ससंबंधी चॅट झाली होती.
महत्वाच्या बातम्या
लसीचे दोन डोस घेऊनही राज ठाकरेंना कोरोनाची लागण, आई आणि बहिणीचा रिपोर्टही आला पॉझिटीव्ह
अरबाजशी घटस्फोट घेण्याच्या आदल्या रात्री काय काय घडलं होतं? मलायकाने केला मोठा खुलासा
काहीही झाले तरी मी देश सोडून पळून जाणार नाही; जामीन मिळण्यासाठी आर्यनने भर कोर्टात घेतली शप्पथ
सायली कांबळेचे फोटो पाहून चाहते झाले घायाळ; म्हणाले, बघावं आणि बघतच राहावं…
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: