लागा तयारीला! पोस्टात मोठी भरती सुरू, १० वी उत्तीर्णांना मोठी संधी..

October 02, 2021 , 0 Comments

नवी दिल्ली । कोरोना काळात रोजगार गेल्याने अनेकजण आता नवीन कामाच्या शोधात आहेत. असे आसताना आता भारतीय टपाल विभागाने जीडीएस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. टपाल विभाग भरती प्रक्रियेअंतर्गत जम्मू -काश्मीर सर्कलसाठी ग्रामीण डाक सेवकाच्या २६६ पदांची नियुक्ती केली जाणार आहे.

यामुळे ही एक मोठी संधी आहे, कोणताही उमेदवार जो इच्छुक असेल तो @appost.in वर अर्ज करू शकतो. यासाठी २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. GDS च्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी मध्ये १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

तसेच किमान दहावीपर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास करणे अनिवार्य आहे. विहित पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० सप्टेंबर रोजी १८ ते ४० वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सूट देण्यात येईल.

उमेदवारांना या पदासाठी अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागतील. अर्ज फी सर्व महिला, ट्रान्स-महिला उमेदवारांसाठी, सर्व एससी, एसटी उमेदवार आणि सर्व पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी सूट आहे. उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज फी भरू शकतात.

कधी कधी शेवटच्या क्षणी अधिकृत वेबसाइटवरील लोड वाढल्यामुळे, तांत्रिक समस्या येऊ लागतात, म्हणून लवकरात लवकर अर्ज करा. ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी जास्त अटी देखील देण्यात आल्या नाहीत.

गेल्यावर्षी आलेल्या कोरोनामुळे अनेकांच्या हातचे काम गेले आहे. यामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. यामुळे आता अनेकजण काम मिळवण्यासाठी बाहेर पडले आहेत. त्यांना ही एक संधी आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: