अरे देवा! फोटोग्राफरला लग्नात जेवण मिळालं नाही म्हणून नवरदेवासमोरच डिलिट केले लग्नाचे सर्व फोटो

October 01, 2021 , 0 Comments

मुंबई। लग्न म्हटलं तर फोटोग्राफर येतोच. आजकाल अगदी छोट्या मोठ्या गोष्टीच्या आठवणी आपण कॅमेऱ्यात कैद करत असतो. त्यात लग्न हे आयुष्यातील महत्त्वाचा भाग असल्याने लग्नाचा एक एक क्षण आपण फोटोग्राफरला कॅमेऱ्यात टिपण्यासाठी सांगत असतो. फोटोग्राफर योग्य त्या किंमतीत फोटो काढून देत असतो.

मात्र सध्या असा एक फोटोग्राफर चर्चेत आहे. ज्याला लग्नात जेवण मिळालं नाही. त्यामुळे तो भडकला. व त्याने नवरदेवाच्या डोळ्यांसमोरच लग्नाचे सगळे फोटो डिलीट करून तो तिथून निघून गेला आहे. फोटोग्राफरने एक पोस्ट केली आहे. लग्नात फोटोग्राफी करणाऱ्या फोटोग्राफरने या पोस्टमध्ये सांगितले की, मी फोटोग्राफर नाही आहे.

मी तर डॉग ग्रुमर आहे. मी फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी दिवसभर कुत्र्यांचे ढिगभर फोटो काढत असतो. मात्र माझ्या मित्राने पैसे वाचवण्यासाठी त्याच्या लग्नात मला फोटोग्राफी करण्यास सांगितले. मी त्याला सांगितले की, मला हे काम येत नाही. मात्र त्याने परफेक्शनची गरज नसल्याचे सांगत मला हे काम करण्यास भाग पाडले.

फोटोग्राफर २५० डॉलरमध्ये हे काम करण्यास तयार झाला. त्याने ११ वाजता आपले काम सुरू केले. हे काम संध्याकाळी ७.३० च्या सुमारास संपणार होते. मात्र संध्याकाळी पाचच्या सुमारास जेवण वाढण्यात येत होते. तेव्हा मला फोटो काढायचे असल्याने जेवणासाठी थांबता येणार नाही असे सांगण्यात आले. माझ्यासाठी एकही टेबल रिकामी ठेवले गेले नाही.

हा फोटोग्राफर पुढे म्हणाला की, तो या कामामुळे खूप थकला होता. त्याला त्याच्या निर्णयाचे दु:ख होत होते. त्याची अवस्था खूप वाईट झाली होती. तिथे एसी नसल्याने खूप गरम होत होते. तसेच आजूबाजूला पाणीही नव्हते. त्यामुळे मला खाण्यापिण्यासाठी २० मिनिटांचा ब्रेक हवा आहे, असे नवऱ्याला सांगितले. मात्र नवरदेवाने त्याचे म्हणणे ऐकून घेतले नाही.

त्याने एकतर फोटोग्राफी कर नाही तर पैसे न घेता घरी निघून जा असे या नवरदेवाला सांगितले. नवरदेवाचे हे बोलणे ऐकून फोटोग्राफरची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने नवरदेवाला विचारले की अगदी नक्की ना, त्यावर नवरदेव हो म्हणाला.

त्याचे हे उदगार ऐकताच फोटोग्राफरने कॅमेऱ्यात काढलेले सर्व फोटो नवरदेवासमोरच डिलीट केले. तसेच आता मी तुमचा फोटोग्राफर नाही असे सांगत तो तिथून निघून गेला. दरम्यान, लग्न झाल्यानंतर हे कपल हनिमूनसाठी गेले होते.

मात्र ते आता सोशल मीडियापासूनही दूर आहेत. कारण लोक त्यांना लग्नाच्या फोटोंबाबत विचारत आहेत. सध्या या फोटोग्राफरची पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली असून फोटोग्राफरनं केलेल्या कृत्याला अनेकांनी पाठींबा दर्शवला आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: