भीषण अपघात: १५० फूट खोल दरीत कोसळला मालवाहू ट्रक; चालकाचा मृत्यू

October 01, 2021 0 Comments

: चिपळूण-कराड मार्गावर कुंभार्ली घाटात भीषण झाला आहे. आयशर ट्रक दरीत कोसळून झालेल्या या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सलमान खान असं मृत चालकाचं नाव आहे. कुंभार्ली घाटात १५० फूट खोल दरीत आयशर ट्रक कोसळला. हा अपघात बुधवारी रात्री उशिरा झाल्याची माहिती आहे. सकाळी घाटमाथा चेक पोस्टला ड्युटीवर जाणारे पोलीस कॉन्स्टेबल सुजित कदम यांना रस्त्याचा कठडा तुटल्याचं लक्षात आलं. यावेळी त्यांनी सतर्कता दाखवल्याने हा अपघात झाल्याचे लक्षात आले. अवघड वळणावर उजवीकडे असलेल्या खोल दरीत हा मालवाहू ट्रक कोसळला. अपघातग्रस्त वाहन हे खेडमधील आंब्रे यांच्या ट्रान्सपोर्ट सेवेतील होते. या गाडीत लोटे येथील एमआयडीसीतील कान्सई नेरोलेक या कंपनीचा माल होता. प्राथमिक अंदाजानुसार चालकाला झोप आल्याने किंवा गाडीच्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडला असावा अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मात्र अपघाताचं नेमकं कारण पुढील तपासात कळू शकते. दरम्यान, मूळचा दापोलीतील असलेला चालक सलमान शेख चिपळूणमधील कावीळतळीत सध्या कामाच्या निमित्ताने वास्तव्यास होता. शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील करत आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: