aryan khan drugs partyआर्यन खान ड्रग प्रकरण: सुनावणीदरम्यान शाहरूख खानची मॅनेजर कोर्टात रडत होती
मुंबई: क्रूझवरील ड्रग पार्टी प्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड सुपरस्टार याचा मुलगा याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून उद्या शुक्रवारी ११ वाजता सुनावणी होत आहे. आज कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शाहरूख खान याची मॅनेजर पूजा ददलानी उपस्थित होती. सुनावणीदरम्यान पूजाला अश्रू आवरणं कठीण जात होतं. आर्यनती स्थिती तिला पाहवत नसल्याने ती सारखी रडत होती. (manager of was crying in court during the drug party case hearing) मुंबईच्या समु्द्रातील क्रूझवरील ड्रग पार्टी प्रकरणी कोर्टात पार्टीच्या त्या रात्री क्रूझवर नेमके काय काय घडले याची संपूर्ण माहिती आर्यनने दिली. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी आर्यनच्या वतीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. आर्यनने सांगितले की, 'मी क्रूझ टर्मिनलवर पोहोचलो. तिथे अरबाजही होता. मी त्याला ओळखत होतो, त्यामुळे आम्ही दोघे एकत्रच क्रूझवर गेलो. मी तिथे पोहोचताच त्यांनी मला विचारले की माझ्याकडे ड्रग आहे का? मी म्हटले की माझ्याकडे ड्रग नाही. त्यानंतर त्यांनी माझी बॅग तपासली. त्यानंतर माझी तपासणी केली. मात्र त्यांना काहीही सापडले नाही. त्यानंतर त्यांनी माझा फोन घेतला आणि मला एनसीबी कार्यालयात नेले. रात्री सुमारे दीड ते दोन वाजता मला माझ्या वकिलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली.' क्लिक करा आणि वाचा- आर्यनने आपली बाजू मांडली असली तरी देखील एनसीबीनेही अनेक गोष्टी कोर्टाला सुनावणीदरम्यान सांगितल्या आहेत. आर्यन खानच्या फोनमध्ये आक्षेपार्ह फोटो आढळल्याचे एनसीबीने कोर्टाला सांगितले. आर्यनच्या फोनमध्ये पिक्चर चॅटसंबंधित काही लिंक्स मिळाल्या आहेत. त्या आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंगशी संबंधित असाव्यात, असे एनसीबीने म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- या चॅट्समध्ये काही कोडही आढळले आहेत. त्यांचा उलगडा होणे गरजेचे असून त्यासाठी चौकशी आवश्यक असल्याने ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी मिळणे आवश्यक असल्याची विनंती एनसीबीने कोर्टाला केली. त्यावर कोर्टाने आर्यन खानसह अन्य दोघांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी ठोठावली होती. वाचा: आता उद्या शुक्रवारी आर्यन आणि इतरांच्या जामीन अर्जावर सुनावणी होत असून, आर्यनला जामीन मिळणार का हे उद्या स्पष्ट होणार आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: