Weather Alert : राज्यावर आस्मानी संकट, आजपासून 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

September 13, 2021 0 Comments

मुंबई : राज्यात आठवडाभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक गावांवर पूर परिस्थिती ओढवली असून सखल भागात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पण हा धोका आता आणखी वाढणार आहे. कारण, हवामान खात्याने (weather department) दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून यामुळे अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ( strong winds on west coast for the next 3 4 days with heavy to very heavy rains expected in the state) बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यामुळे येत्या २४ तासात अतिवृष्टीची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पश्चिम किनारपट्टीवर तीन ते चार दिवस जोरदार वारे वाहतील. त्याचबरोबर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर पाहायला मिळेल. इतकंच नाहीतर मुंबई, पालघर, रायगड या ठिकाणी देखील अतिवृष्टीची शक्यता आहे. पालघर, रायगड या ठिकाणी देखील अतिवृष्टीची शक्यता पालघर, ठाणे येथे सोमवार, मंगळवारी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तर रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमधील घाट परिसर येथे ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात सोमवार, मंगळवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. सोमवारी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथे त्याची तीव्रता थोडी अधिक असू शकते. विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पालघरमध्ये सोमवार ते बुधवार तर ठाणे येथे सोमवार, मंगळवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अती तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस असेल अशी शक्यता आहे. रायगडमध्येही सोमवारी तुरळक ठिकाणी अती तीव्र मुसळधार पाऊस असू शकेल. तर रत्नागिरीमध्ये सोमवारपर्यंत तीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर थोडा कमी होऊन तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. (weather alert strong winds on west coast for the next 3 4 days with heavy to very heavy rains expected in the state) मुसळधार पावसाची शक्यता सिंधुदुर्गातही मंगळवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. धुळ्यामध्ये सोमवार-मंगळवारी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेगही वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. घाट परिसरातही मुसळधार? नंदुरबार, जळगावमध्ये मंगळवारी ही स्थिती असू शकेल. मध्य महाराष्ट्रात पुण्यातील घाट परिसरासाठी बुधवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट परिसरासाठी मंगळवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. या काळात तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात सोमवार, मंगळवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. सोमवारी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथे त्याची तीव्रता थोडी अधिक असू शकते. विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अमरावतीमध्ये सोमवारी तर गोंदियामध्ये मंगळवार, बुधवारी, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर येथे सोमवारी आणि गुरुवारी तुरळक ठिकाणी पावसाचा जोर थोडा वाढू शकेल. गोंदियामध्ये बुधवारपर्यंत मुसळधार ते तीव्र मुसळधार पाऊस पडू शकेल. वर्धा, यवतमाळ येथेही सोमवारी पावसाची जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे तुरळक ठिकाणी पाणी साचू शकते तसेच कच्च्या रस्त्यांचेही नुकसान होऊ शकते. (weather alert strong winds on west coast for the next 3 4 days with heavy to very heavy rains expected in the state)


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: