VIDEO: अरे बापरे! ऑनलाईन मिटींग चालू असताना मुलाने दाखवली ‘ती’ गोष्ट; महिला मंत्र्यालाही आलं हसू

September 02, 2021 , 0 Comments

सध्या सर्वांची काम ऑनलाईन सुरु आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण असो वा कर्मचाऱ्याची मिटींग कोरोनामुळे सर्वच गोष्टी ऑनलाईन पद्धतीने केल्या जात आहे. त्यामुळे ऑनलाईन मिटींगमधले अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक न्युझिलंडची महिला मंत्री लाईव्ह मुलाखत देत होती. तेव्हा त्यांच्या मुलाने जे केलं आहे, ते पाहून लोकं हसून हसून लोटपोट झाले आहे.

व्हिडिओमध्ये मुलाने जे केलं आहे, पाहून मंत्री कार्मेल थोड्या गंभीर झाल्या होत्या, पण त्यानंतर त्यांनी स्वत:च हा व्हिडिओ ट्विट केला आहे. तसेच त्यावेळी घडलेला प्रसंग कार्मेल यांनी सांगितला आहे.

कार्मेल सेपुलोनी या न्युझिलंडच्या सामाजिक विकास मंत्री आहे. त्या रेडिओ कर्मचाऱ्यांसोबत लाईव्ह मुलाखत देत होत्या. त्याचवेळी त्यांच्या रुममध्ये त्यांचा मुलगा आला आणि त्याने सर्व लोकांना गाजर दाखवायला सुरुवात केली.

मुलगा लोकांना गाजर दाखवतोय हे पाहून कार्मेल या हैराण होतात. त्यामुळे नक्की काय करावं हे त्यांनाही कळत नाही. कार्मेल मुलाच्या हातातून गाजर घेण्याचा प्रयत्न करते, पण तो त्यांच्या हाती लागत नाही. त्यानंतर तो चिमुकला हातवर करुन त्या लोकांना गाजर दाखवत असतो, असे या व्हिडिओमध्ये दिसून येते.

कार्मेल यांनीच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखो लोकांनी बघितले असून अनेक लोकांनी या व्हिडिओला मजेदार कमेंट केल्या आहे.

महत्वाच्या बातम्या-

तुरूंगातून बाहेर येताचं अभिनेत्रीचा हटके अंदाज; फोटो व्हायरल होताच रंगल्या चर्चा
मोठी बातमी! तहसीलदार ज्योती देवरेंनी पकडला लंकेंचा वाळू चोरणारा ट्रक
ढोंगी समाजसेवक अक्षय बोऱ्हाडेला खंडणी मागितल्या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी केली अटक


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: