kirit somaiya challeges cm: राणेंचा बंगला अनधिकृत असेल तर तो पाडायला मुख्यमंत्री घाबरतात का?; सोमय्यांचा सवाल
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यानंतर आता यांच्या अलिबाग जिल्ह्यातील जमीन घोटाळा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यातील पारनेरच्या जरंडेश्वर साखर कारखान्याला भेट देवून तेथील घोटाळा उघडकीस आणणार असल्याची घोषणा भाजपचे नेते माजी खासदार यांनी केली. त्यामुळे त्यांच्या रडारवर आता थेट आणि उपमुख्यमंत्री अजित पवारच असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बंगला अनाधिकृत असेल तर तो पाडायला ठाकरे पितापुत्र राणेंना घाबरतात का ? असा सवालही त्यांनी केला. (if bungalow of narayan rane is unauthorized is the chief minister afraid to demolish it asks ) मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कागल पोलिसात तक्रार देण्यासाठी व अंबाबाई दर्शनासाठी सोमय्या कोल्हापूरला येत होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन करण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना कराड येथे अडविले. तेथे पत्रकार बैठकीत बोलताना त्यांनी महाविकास आघाडीबरोबरच ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. कुणाच्याही धमक्यांना मी घाबरणार नाही, मी घोटाळे बाहेर काढणारच असे स्पष्ट करतानाच मला किती ठिकाणी अडविणार असा सवाल त्यांनी केला. क्लिक करा आणि वाचा- सोमय्या म्हणाले, ‘ मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री वळसे पाटील यांच्या दडपशाहीमुळे आणि त्यांच्या आदेशानुसारच मला अडविण्यात आले. माझे भांडण पोलिसांबरोबर नाही. म्हणून मी कोल्हापूरचा दौरा स्थगित केला. पण मी पुन्हा लवकरच कोल्हापूरला जाणार आहे. तेथे मी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देणार आहे. त्यापुढे जात आपण गुरुवारी पारनेर येथील जरंडेश्वर साखर साखर कारखान्याला भेट देवून तेथील घोटाळा उघड करणार आहे. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांनी विकत घेतला आहे. त्यानंतर रविवारी अलिबाग जिल्ह्यातील कोलाई गावात रश्मी ठाकरे यांनी जो जमीन खरेदीत घोटाळा केला आहे, तेथील १९ बंगल्याच्या या घोटाळ्याची पाहणी करणार आहे. यामुळे मला कुठं कुठ अडविणार, किती वेळा अडविणार असा सवाल करून ते म्हणाले, ठाकरे सरकारची ही दडपशाही आम्ही सहन करणार नाही. मी महाविकास आघाडी सरकारमधील अनेकांचे घोटाळे बाहेर काढनारच. क्लिक करा आणि वाचा- ते म्हणाले, हे सरकार ठाकरे आणि पवार चालवतात. त्यामुळे हे या घोटाळ्याला तेही जबाबदार आहेत. मला मुलूंडमध्ये सहा तास घरी स्थानबद्ध करण्यात आले. गणेश विसर्जनाला जाण्यापासून अडविले. मुंबई, ठाणे, कल्याण येथील पोलिसांनी मला कोल्हापूरला जाताना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात बनावटगिरी केली. हे सारे करताना माझ्यावर हल्ला होणार हे जर सरकारला माहीत होते तर त्यांनी हल्ला करू पाहणाऱ्यावर कारवाई का केली नाही असा सवालही त्यांनी केला. या सर्व प्रकरणाची पहिली जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे. तक्रारदाराला रोखण्याचा इतिहास ठाकरे सरकारने केल्याचा टोलाही त्यांनी मारला. क्लिक करा आणि वाचा- केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याच्या अनाधिकृत बांधकामाबाबत तुम्ही तक्रार केला होता, मग आता तुम्ही त्या विषयी का बोलत नाही असा प्रश्न विचारला असता मूळ प्रश्नाला बगल देत ते म्हणाले, राणे यांच्या बंगल्याच्या बांधकामाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित आहे. त्यामुळे राज्य सरकारच त्यावर कारवाई करू शकते. मग मुख्यमंत्री ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ही कारवाई करण्यास राणे यांना घाबरतात का ? असा सवाल त्यांनी केला. पूर्वी विविध पक्षात असलेल्या आणि आता भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांच्या विरोधात तक्रार का करत नाही, तेव्हा केलेल्या तक्रारीबाबत आता का बोलत नाही या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. मंत्री मुश्रीफ हे मी केलेल्या घोटाळ्यावर उत्तर देत नाहीत. ते मला शंभर कोटींच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची भीती घालत आहेत अशा धमक्यांना मी भीत नाही असा इशारा देताना ते म्हणाले, आतापर्यंत अशा दहा नोटिसा आल्या आहेत. त्यामुळे नुकसानीच्या दाव्याला मी कधीच भीत नाही.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: