coronavirus latest updates: करोनाचा संसर्ग येतोय आटोक्यात; पाहा, संपूर्ण राज्यातील ताजी स्थिती!

September 28, 2021 0 Comments

मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत देखील घट झाली असून बाधित मृतांच्या सख्येत देखील घट पाहायला मिळाली आहे. तसेच शिवाय कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटल्याने राज्यातील करोना संसर्गाची आजची स्थिती कालच्या तुलनेत अधिक दिलासादायक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात २ हजार ४३२ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार २०६ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण २ हजार ८९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ३ हजार २९२ इतकी होती. तर, आज ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ३६ इतकी होती. (maharashtra registered 2432 new cases in a day with 2895 patients recovered and 32 deaths today) आज राज्यात झालेल्या ३२ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ६२ हजार २४८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के इतके झाले आहे. क्लिक करा आणि वाचा- राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या घटली आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३७ हजार ०३६ इतकी आहे. काल ही संख्या ३७ हजार ८६० इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ९ हजार २४३ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ५ हजार ८८८ आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ५ हजार ५०६ अशी वाढली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या २ हजार २०१ वर आहे. तर, सांगलीत एकूण १ हजार ३५७ आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार ६९९ इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- मुंबईत उपचार घेत आहेत ५,०५३ रुग्ण मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार ०५३ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ६७४ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ७२२, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८८६ इतकी खाली आली आहे. धुळे जिल्ह्यात एक सक्रिय रुग्ण या बरोबरच, औरंगाबादमध्ये २९३, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ११५ इतकी वाढली आहे. अमरावतीत ही संख्या १०० वर आली आहे. तर धुळे आणि भंडाऱ्यात सर्वात कमी, प्रत्येकी २ सक्रिय रुग्ण आहेत. क्लिक करा आणि वाचा- २,५७,१४४ व्यक्ती होम क्वारंटाइन आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ८२ लाख ८६ हजार ०३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ४१ हजार ७६२ (११.२२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ५७ हजार १४४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ५१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: