कर्जत-जामखेड पाठोपाठ राहुरीतही राष्ट्रवादीचा भाजपला धक्का!

September 26, 2021 0 Comments

अहमदनगर : नगरपालिका निवडणुकाच्या तोंडावर कर्जत-जामखेड मध्ये कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने भाजपला तसाच धक्का आता राहुरीतही दिला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचे राज्यमंत्री यांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ( ) वाचा: नगरपरिषदेतील भाजपचे नगरसेवक शहाजी जाधव यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याशिवाय मतदारसंघातील ग्रामीण भागातील धनगरवाडीचे सरपंच, सदस्य, तसेच इतर ठिकाणच्या काही भाजपच्या कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्यमंत्री तनपुरे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना तनपुरे म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या शिकवणीप्रमाणे राष्ट्रवादीत येणाऱ्या प्रत्येकाचा योग्य तो सन्मान राखला जाईल. पक्षावर विश्वास ठेवून प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत आहे. वाचा: भाजप नेते शिवाजी कर्डिले पूर्वी या मतदारसंघातून आमदार होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला. आता पुढील निवडणुकीसाठी कर्डिले यांनी तयारी सुरू केली आहे. राहुरीत अपयश आल्याने त्यांच्यापुढे विधान परिषेदेची स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढविणे तसेच पुढील निवडणुकीला राहुरी ऐवजी नगर तालुक्यालगतच्या श्रीगोंदा मतदारसंघातून निवडणूक लढविणे असे पर्याय असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील त्यांच्या समर्थकांनी पक्ष सोडून विरोधी गोटात सामील होणे लक्षवेधी ठरत आहे. कर्जतमध्येही भाजपचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत आणि त्या आधी भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तेथेही भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांना या कार्यकर्त्यांनी धक्का दिला आहे. हे दोन्ही मतदारसंघ भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या लोकसभा मतदारसंघात येतात. वाचा: लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ही पक्षांतरे सुरू झाली आहेत. कर्जत-जामखेड आणि राहुरी या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे युवा नेते प्रथमच आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. हा विजय मिळविताना त्यांनी भाजपच्या दिग्गज नेत्यांचा पराभव केला असून त्यानंतरही मतदारसंघावर आपली पकड मजबूत ठेवली आहे. आता भाजपच्या कार्यकर्त्यांना खेचून स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याची तयारी त्यांनी सुरू केल्याचे दिसून येते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: