मनसेच्या एकमेव नगराध्यक्षाचं पद धोक्यात? नगर विकास विभागाने पाठवली नोटीस
: जिल्ह्यातील खेड नगर परिषदेच्या कारभारात भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवून शिवसेनेच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी व वरिष्ठ स्तरावर केलेल्या तक्रारीमुळे मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नगरविकास विभागाच्या सचिवांनी खेडेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून आगामी १५ दिवसांत म्हणणे मांडण्यास सांगितलं आहे. अन्यथा वैभव खेडेकर यांचं नगराध्यक्ष पद धोक्यात येण्याचीही शक्यता आहे. खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर कार्यरत असताना गैरवर्तन, अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केलेली असल्याची तक्रार शिवसेनेचे गटनेते प्रज्योत तोडकरी, उपनगराध्यक्ष सुनील बाबुराव दरेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केली होती. तसंच याबाबत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली आणि चौकशी करुन चौकशी अहवाल आपल्या अभिप्रायांसह जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास सादर केला आहे. नगराध्यक्षांवर काय आहेत आरोप? खेड नगरपरिषद हद्दीतील नगरोत्थान (जिल्हास्तर) या योजनेअंतर्गत केलेल्या विकास कामांच्या अंतिम बिलावर विहीत पद्धतीने कार्यवाही न करता काही अंतिम देयकांवर मुख्याधिकारी व संबंधित विभागप्रमुख यांच्या स्वाक्षरी नसताना एकट्याने स्वाक्षरी केली आहे. १५ टक्के सहायक अनुदान अंतर्गत विकास कामांच्या करारनाम्यावर नगरसेविका मानसी चव्हाण या स्थायी समिती सदस्य नसताना त्यांच्यासह स्वाक्षरी करुन पदाचा गैरवापर केला आहे. यासोबतच आणखी काही आरोपांत तथ्य असल्याचं नगर विकास विभागाने नोटीसीमध्ये म्हटलं आहे. 'हे माझ्याविरोधात शिवसेनेचे षडयंत्र' सगळ्या आरोपांबाबत खेडचे नगराध्यक्ष तथा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की, 'हे सगळं आपल्याला राजकारणातून संपवण्यासाठी शिवसेनेने आखलेलं षडयंत्र आहे. आगामी निवडणुकीतून आपल्याला बाद करावे यासाठी हे सगळे चालू आहे. पण या सगळ्याला आपण योग्य ते उत्तर देऊ,' अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी बुधवारी सायंकाळी दिली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: