विराट पडला रोहीतवर भारी! आरसीबीकडून मुंबई इंडीयन्स चारीमुंड्या चित; मुंबईचा लाजिरवाना पराभव

September 27, 2021 , 0 Comments

आयपीएल 2021 च्या 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) ने मुंबई इंडियन्सचा (MI) 54 धावांनी पराभव केला. हर्षल पटेलने हॅटट्रिक घेतली आणि संपूर्ण गेम आरसीबीकडे वळवला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कर्णधार विराट कोहली (51) आणि ग्लेन मॅक्सवेल (56) यांच्या अर्धशतकांच्या मदतीने मुंबई इंडियन्सविरुद्ध 6 बाद 165 धावा केल्या.

श्रीकर भारतने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी 32 धावांचे योगदान दिले. मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने तीन तर ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ले आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. कोहलीने सुरुवातीपासूनच आक्रमकता दाखवली आणि ट्रेंट बोल्टवर डावाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला.

रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉकने मुंबई इंडियन्सच्या वतीन प्रथन फलंदाजी केली होती. दोघांनी वेगाने भर घातली आणि 5 षटकांत मुंबई इंडियन्सचा स्कोअर 50 धावांवर पोहोचला. डी कॉक 23 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 24 धावा काढून बाद झाला.

हर्षल पटेलने रचला इतिहास
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या हर्षल पटेलने इतिहास घडवला आहे. त्याने आयपीएल 2021 मध्ये हॅटट्रिक घेतली. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध ही आश्चर्यकारक कामगिरी केली. हर्षल पटेलने हार्दिक पंड्या, किरॉन पोलार्ड आणि राहुल चाहरला बाद करत आपली आयपीएल हॅटट्रिक पूर्ण केली.

या मोसमातील ही पहिली हॅटट्रिक आहे. हर्षल पटेल हॅटट्रिक घेणारा तिसरा आरसीबीचा गोलंदाज आहे. हर्षलच्या आधी, प्रवीण कुमारने 2010 मध्ये आणि 2017 मध्ये सॅम्युअल बद्रीने आरसीबीसाठी हॅटट्रिक घेतली आहे. त्याचबरोबर मुंबईविरुद्ध असा पराक्रम करणारा हर्षल तिसरा खेळाडूही आहे. त्याच्या आधी सॅम्युअल बद्रीने मुंबईविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती.

हर्षल पटेलने मुंबई इंडियन्सविरुद्ध 17 धावांत चार विकेट्स घेतल्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ केवळ 111 धावांवर बाद झाला. 165 धावांचा पाठलाग करताना त्यांची वाईट अवस्था झाली होती. हर्षलने प्रथम हॅटट्रिक घेतली आणि नंतर अॅडम मिल्नेला त्याच्या शेवटच्या षटकात बाद करून चौथा विकेट मिळवला.

हर्षलच्या अप्रतिम खेळीमुळे मुंबईचा संघ पाच विकेटवर 106 धावा करत 111 धावांवर चितपट झाला. आरसीबीने या हंगामात आपला सहावा विजय नोंदवला आहे आणि गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान मजबूत केले आहे. विराटची आरसीबी आता पुन्हा एकदा आपल्या रंगात आली आहे.

महत्वाच्या बातम्या
कोणत्याही क्षणी वीज पुरवठा, इंटरनेट, फोन होणार बंद, पृथ्वीवर १९८१ साली आले होते असेच संकट
५६ आमदारांवर मुख्यमंत्री होतो तर ४५ नगरसेवकांवर महापौर होणारच; पिंपरीचा महापौर आपलाच
चवताळलेला विराट रोहीत विरोधात कडाडला; प्रचंड आक्रमक होत दिला करारा जबाब
मोदीजी अमेरीकेहून माझ्यासाठी ‘ही’ गोष्ट आणा; बाॅलीवूडच्या हाॅट अभिनेत्रीची मोदींकडे मागणी


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: