दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शेतात काम करू नका; सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन

September 24, 2021 , 0 Comments

ऑगस्ट महिन्यात ये जा करणाऱ्या पावसाने अपेक्षेप्रमाणे हजेरी लावली नसली तरी सप्टेंबर महिना गाजवण्याची तयारी यंदा पावसाने केलेली दिसत आहे. पुढचे काही दिवस हवामान खात्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

याच पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेता जिल्यातील सर्व शेतकरी आणि नागरिकांना प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

विजांचा कडकडाट सुरू असल्याने बाहेर जाण्याचे टाळावे तसेच पाऊस सुरू असताना शेतकऱ्यांनी दुपारी ३ ते ७ या वेळेत शेतीची कामे करू नये. कारण यादरम्यान विजा जास्त पडण्याची शक्यता असते. जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्रोताजवळ आणि विद्युत खांबाजवळ न बांधता सुरक्षित जागी बांधावीत.

मांजरा धरणात पावसामुळे पाण्याची आवक सुरूच असल्याने हे धरण तुडुंब भरले आहे. पूर नियंत्रित करण्यासाठी धरणातील पाणी नदीद्वारे तसेच कालव्यातून ठरवलेल्या नियमाप्रमाणे सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच पाण्याची पातळी वाढत राहिल्यास पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता वाढली आहे.

नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे. पुढील दोन ते तीन दिवस पाऊस असाच पडण्याची शक्यता असल्याने जिल्यातील मध्यम प्रकल्प भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पावसाची परिस्थिती बघता धरणातील पाण्याचा कधीही विसर्ग करावे लागणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पूरस्थिती व विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

 

महत्वाच्या बातम्या
बिग बॉस मराठीत प्रचंड वादग्रस्त ठरलेल्या शिवलीला पाटील आहेत तरी कोण? जाणून घ्या..
‘राऊतांनी धोतराचा व राज्यपालांचा अपमान केलाय त्यांनी हिंदू धर्माची माफी मागावी’
गोरखपुरमधील घरात चोरीच्या उद्देशाने चोर आत शिरले; घरमालकाने थेट अमेरिकेतून चोरांना पकडले
१५ तासांच्या प्रवासातही मोदी आराम करत नाहीत, करतात ‘ही’ कामे, वाचा…


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: