मोठी बातमी! बाळूमामाच्या नावाखाली अनेकांना लुटणाऱ्या मनोहर भोसलेला साताऱ्यातून अटक
बारामती । गेल्या काही दिवसांपासून मनोहर भोसले चर्चेत आहेत. त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. आता बारामतीतील शशिकांत सुभाष खरात याच्या वडिलांच्या आजारपणाचा त्यांनी गैरफायदा घेतला आहे. मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव केला आहे.
त्यांच्या वडिलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला. त्यांना जीविताची भीती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी २ लाख ५१ हजार रुपये घेत फसवणूक केली. तसेच पैसे परत मागितले असता ठार मारण्याची धमकी दिली होती.
तसेच एका महिलेने मनोहर भोसले विरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली. तेव्हापासून मनोहर भोसले फरारी होते. यामुळे पोलिस त्यांचा शोध घेत होते. तेव्हा त्यांना तो सातार्यात असल्याची माहिती मिळाली होती. तेव्हा त्यांना बारामती तालुका पोलिसांनी सातार्यातून ताब्यात घेतले आहे.
यामुळे आता अनेक प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे. यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याआधी देखील त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली जात होती. त्यांच्या पत्नीच्या नावे जमीन गाड्या असल्याचे सांगितले जात होते.
त्याने बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून अनेकांकडून पैसे घेतले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता अनेकजण पुढे येऊन तक्रार दाखल करत आहेत. आता पोलिस तपासात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: