“आरएसएस आणि तालिबान सारखेच, फक्त आरएसएस तालिबानसारखा शक्तिशाली नाही”

September 05, 2021 , 0 Comments

बॉलिवूडचे प्रसिद्ध कवी, गीतकार आणि चित्रपट कथा लेखक जावेद अख्तर अनेकदा त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी चर्चेत येत असतात. आता जावेद अख्तर यांनी तालिबानची तुलना आरएसएसशी केली आहे.

तसेच जावेद अख्तर यांनी या विचारधारेचे समर्थन करणाऱ्या लोकांना आत्मचिंतन करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी एनडीटीव्हीला एक मुलाखत दिली होती. यावेळी जावेद अख्तर यांनी थेट सांगितले की तालिबान आणि आरएसएस, बजरंग दल, वीएचपीसारख्या संघटनांच्या विचारांमध्ये कोणताही फरक नाही.

देशाचे संविधान या संस्थांच्या ध्येयामध्ये अडथळा म्हणून काम करत आहे, जर त्यांना संधी मिळाली तर ते घटनात्मक सीमेचेही उल्लंघन करतील, असेही जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.

हे लोक तालिबानसारखे लोक आहेत, फक्त नावे भिन्न आहेत. भारतीय संविधान त्यांच्या मार्गातील एक काटा आहे, परंतु जर त्यांना संधी मिळाली तर ते त्याची सीमाही ओलांडतील, असे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे, जावेद अख्तर यांनी मुस्लिमांच्या त्या भागावर टीका केली आहे जे तालिबानने सत्ता घेतल्याने खुश आहेत. तालिबान रानटी आहे, मध्ययुगीन मानसिकता आहे हे सत्य मी पूर्णपणे स्वीकारतो, पण या संघटना पण त्यांच्यापेक्षा वेगळ्या नाही. यांची मानसिकता समान आहे, असे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.

मुलाखतीत ते पुढे म्हणाले की, जगातील सर्व उजव्या विचार सरणीचे समान आहेत. ते म्हणतात की जगातील कट्टरपंथी मग ते मुस्लिम असो, हिंदू उजवे विंग किंवा ख्रिश्चन उजवे विंग. जिथे तालिबानला इस्लामिक देश निर्माण करायचा आहे, त्याच संघटनांना हिंदु राष्ट्र निर्माण करायचे आहे.

तसेच ज्यांच्याकडे वेगवेगळ्या परंपरा आहेत त्यांना स्वीकारले जाणार नाही. या लोकांचा असा विश्वास आहे की मुलगा आणि मुलगी एकत्र उद्यानात जाऊ नयेत. तालिबान आणि आरएसएस मध्ये फरक एवढाच आहे की तो अद्याप तालिबानसारखा शक्तिशाली नाही, पण त्यांचा नेमका एकच हेतू आहे, असेही जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

आम्हाला आमची बिस्कीटच विकायची नाहीत; पारले बिस्कीटच्या विरोधात सरकारकडे तक्रार
भयंकर! चिमुरडी वडिलांसोबत शेतात गेली असता घोड्याने मारली लाथ; अन् चिमुरडीचा डोळा आला बाहेर
अकोल्यात महिला तलाठी निघाली चोर! मोबाइलवर मारला डल्ला, महिलेचे प्रताप पाहून पोलीस हैराण


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: