जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर 'हे' भीषण चित्र आलं समोर

September 02, 2021 0 Comments

जळगाव: जिल्ह्यातील , भडगाव आणि या तीन तालुक्यांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला. या तिन्ही तालुक्यातील ३८ गावे पुराच्या पाण्यामुळे बाधित झाली असून, या गावांमध्ये ६७५ घरांची पडझड झाली आहे तर ६६१ लहान-मोठ्या जनावरे मृत्युमुखी पडली आहेत व ३०० दुकानांमध्ये पाणी घुसून मालाचे नुकसान झाले आहे. असा अहवाल निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्रालयाकडे सादर केला आहे. ( ) वाचा: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील घाटासह पाटणादेवी परिसरात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर, डोंगरी आणि गिरणा नदीला मंगळवारी पहाटे पूर आला. या पुरामुळे चाळीसगाव शहरासह वाकडी, वाघडू, हिंगोणे, खेर्डे, मुंदखेडे खुर्द, रोकडे, बोरखेडा खुर्द, पातोंडा, ओझर, टाकळी प्र. चा. ही गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. चाळीसगाव शहरातील सखल भागातील अंदाजे ५० ते ६० घरांमध्ये पाणी शिरले आहे. चाळीसगाव शहरात ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तेथील लोकांची तात्पुरती व्यवस्था एबी हायस्कूल व उर्दू हायस्कूलमध्ये करण्यात आलेली आहे. तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था चाळीसगाव नगरपालिकेतर्फे करण्यात आलेली आहे. दरम्यान, पुरामुळे चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या तालुक्यातील ३२ गावे बाधित असून, त्याठिकाणी १५५ लहान तर ५०६ मोठ्या पशूंची हानी झाली आहे. एका ६० वर्षीय वृद्धेचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे ६१७ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे तर २० घरांची पूर्णपणे पडझड झाली आहे. ३०० दुकानांमध्ये पाणी घूसून नुकसान झाले आहे. चाळीसगाव तालुक्यासह भडगाव तालुक्यातील २ तर पाचोरा तालुक्यातील ४ गावे पुरामुळे बाधित आहेत. भडगावात १४ घरांची पडझड झाली आहे. पाचोरा तालुक्यातही २४ घरांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही तालुक्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे १५ हजार ९१५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सादर कलेली आकडेवारी ही प्राथमिक स्वरूपाची असून, सविस्तर माहिती घेण्याचे काम चालू आहे. पुढील सविस्तर अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे. वाचा: कन्नड घाटात दुरुस्तीचे काम सुरू मंगळवारी पहाटे २ ते ३ वाजेदरम्यान अतिवृष्टीमुळे कन्नड घाटात ठिकठिकाणी दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक वाहने दगड-मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. झाडांची रस्त्यावर पडझड झाली आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून वाहतूक सुरळीत करण्यासाठी धुळ्यातील एसडीआरएफचे पथक कार्यरत आहे. घाटातील वाहतूक पूर्ववत होण्यास २४ तासांचा अवधी लागण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. अतिवृष्टीचा १६ हजारावर हेक्टरवरील पिकांना फटका चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने ४२ गावांतील ४३ जार ३८५ शेतकऱ्यांच्या) पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे सादर केला आहे. एकूण १५ हजार ९१५ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. हेक्टरी पिकांचे नुकसान कोरडवाहू ज्वारी - १४३ हेक्टर बाजरी - २५० हेक्टर बागायती कापूस - १२ हजार २१५ मका - ३ हजार ५० इतर पिके - १०० फळपिके -१५० एकूण - १५ हजार ९१५ हेक्टर वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: