घड्याळाचा सम्राट “बिग बेन” आता नव्याने सज्ज होतोय..
‘तू घंटी बीग बेन दी, पुरा लंडन ठुमकदा’ क्वीन या फेमस हिंदी चित्रपटातलं हे गाणं. यातला बिग बेन हे बऱ्याच जणांना माहितीही असेल. जगातला कुठलाही चित्रपट जो लंडनमध्ये शूट केला जातो. मग तो हॉलिवूड असो, बॉलिवूड असो किंवा इतर कोणत्याही भाषेतला. लंडनमधली ती भली मोठी आणि घड्याळं असणारी उंच इमारत असतेच असते. ती उंच घड्याळ म्हणजे ‘बिग बेन’.
लंडनच्या मधोमध ३१६ फूट किंवा ९६ मीटर उंच अशी ही बिग बेन लंडनमधलं आयकॉनिक लँडमार्क आणि पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे. कोणतीही व्यक्ती लंडन दौऱ्यावर गेला कि, ह्या घड्याळीपुढं एक तरी फोटो हमखास काढतोच.
हे जगातील सर्वात मोठे चार चेहऱ्याचे आणि अचूक वेळ दाखवणार क्लॉक टॉवर आहे.
या बिग बेनला क्लॉक टॉवर आणि नंतर सेंट स्टीफन्स टॉवर असेही म्हंटले जायचे. पण युनायटेड किंगडमची राणी एलिझाबेथ दुसरी हिच्या डायमंड जुबलीनिमित्त २०१२ मध्ये त्याचे नाव एलिझाबेथ टॉवर असे ठेवण्यात आले.
हे घड्याळ पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टरचा भाग आहे, जिथे युनायटेड किंगडमची संसद आहे.
१८३४ मध्ये आगीत वेस्टमिन्स्टरचा पॅलेस नष्ट केला. त्यानंतर १८४० च्या दशकात आर्किटेक्ट चार्ल्स बॅरी यांनी तो पुन्हा बांधला, पण बिग बेनची रचना अंमलात आणण्यासाठी त्यांनी ऑगस्टस पुगिनकडे ही कामगिरी सोपवली.
१८४५ मध्ये वेस्टमिन्स्टर पॅलेसच्या उत्तर टोकावर टॉवरचे बांधकाम सुरू झाले. पुगिनने ते आतून बाहेरून निओ-गॉथिक स्टाईलने बांधले.
घड्याळाचे डिझाईन हे एक मोठे आव्हान होते. तोपर्यंत, वेळ कधीही अचूक नव्हता कारण ती सूर्याने मोजली होती. दरम्यान, माहितीनुसार, खगोलशास्त्रज्ञ रॉयलला जगातील सर्वात अचूक बुर्ज घड्याळ हवे होते, जे पुढच्या तासाचा ठोका पडण्याच्या आत सेकंदात दुसरा ठोका इतके अचूक असावे.
हे काम पूर्ण करण्यासाठी चार लहान क्वार्टर घंटासह एक मोठी घंटा बांधली गेली. दर १५ मिनिटांनी एक छोटी घंटा वाजते आणि दर तासाला मोठी घंटा वाजते.
१८९२ ला टॉवरच्या टॉपला आयर्टन लाइट बसवण्यात आला. हे संपूर्ण लंडनमध्ये पाहिले जाऊ शकते. असे म्हटले जाते की, ते मूळतः बकिंघम पॅलेसच्या दिशेने चमकते. त्यामुळे राणी व्हिक्टोरिया (१८३७-१९०१) ला समजायचे कि, कायदे करणारे काम करतायेत.
बिग बेन दुरुस्तीच्या कामामुळे बऱ्याचदा बंद असते. परंतु दुसरे महायुद्ध सुरु असताना ते बंद करण्यात आले होते.
दरम्यान, २०१७ मध्ये सरकारने घोषित केले की, बिग बेन चार वर्षांच्या दुरुस्ती प्रक्रियेतून जात असल्याने ते बंद करण्यात येतेय. सरकारच्या या निर्णयामुळे वरिष्ठ खासदार आणि पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावर बरीच टीका झाली.
या चार वर्षाच्या दुरुस्तीत त्यात अनेक बदल केले गेले जातील. ज्यासाठी ८० मिलियन पौंड खर्च करण्यात आलेत. पण त्याची पूर्वीची रचना तशीच ठेवण्यात येणार आहे. तसेच चार घड्याळांपैकी किमान एक बाजू नेहमी चालू राहील.
असे म्हंटले गेलेय कि, या बिग बेनच्या दगडी कोरीव कामाचे गंभीर नुकसान झालेय. लोखंडी कामकाज असणाऱ्या ठिकाणी संपूर्णतः गंज चढलाय. कारण टॉवरची शेवटची दुरुस्ती १९८३ – ८५ मध्ये झाली होती. आता टॉवर वरच्या छताच्या फरशा काढल्या जातील आणि बदलल्या जातील. तसेच प्रवेश सुलभ करण्यासाठी लिफ्ट बसवली जाईल. महत्वाचं म्हणजे घड्याळ्याचं फ्रेमवर्क हे पर्शियन निळ्या रंगात बनले जाईल. जसे १८५९ मध्ये बनवले गेले होते.
सरकारच्या म्हणण्यानुसार बिग बेन २१ शतकाच्या दृष्टीनं सुसज्ज बनवली जाईल.
दरम्यान, हि घड्याळ २०२१ पर्यंत पुन्हा सुरु होईल असे अपेक्षा होती. पण दुरुस्तीचं बरचसं काम आटोपलं असलं तरी अजून थोडं कामं बाकी आहे. या बिग बेनचा शेवटचा आवाज २१ ऑगस्टला ऐकायला मिळालं होता. हा आता रविवारी आणि नवीन वर्षाच्या संध्याकाळी इलेक्ट्रॉनिक घंटा वाजवली जाते. पण त्या बिग बेनचा मेन आवाज आता थेट पुढच्या वर्षी ऐकायला मिळेल असं म्हटलंय जातंय.
हे ही वाचं भिडू :
- इंग्लंडमध्ये सध्या एकच चर्चा रंगलीय.. ऑपरेशन लंडन ब्रिज काय आहे ?
- इंग्लंडनं पास काय दिला नाही, साळवेंनी तिथला वर्ल्डकप टूर्नामेंटच भारतात ओढून आणला.
- ५० गुंठ्यात कष्टाने फुलवलेला कडीपत्ता थेट लंडनच्या बाजारपेठेत विकला.
The post घड्याळाचा सम्राट “बिग बेन” आता नव्याने सज्ज होतोय.. appeared first on BolBhidu.com.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: