मैंने प्यार कियाच्या सीनमध्ये सलमान खानला किस करण्यासाठी घाबरत होती भाग्यश्री; समोर आले हैराण करणारे कारण

September 05, 2021 , 0 Comments

कोरोनाची साथ कमी होत असली तरी अजूनही त्याचा पुर्ण धोका टळलेला नाही. त्यामुळे नवीन रिअॅलिटी कॉमेडी शो प्रेक्षकांचे टेन्शन दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. यंदा रविवारच्या एपिसोडमध्ये, लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री दिसून येणार आहे.

भाग्यश्री यावेळी तिच्यासोबत घडलेले अनेक किस्से सांगताना दिसून येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होणार आहे. जिथे सर्व विनोदी कलाकाराचा मजेदार अभिनय आणि फराह खान सर्वच प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

शोमध्ये सुगंधा मिश्रा भोसले, डॉ संकेत भोसले आणि सिद्धार्थ सागर यांचा एक मजेदार ‘मैने प्यार किया’चा अभिनय सादर करताना दिसून येणार आहे. ते पाहिल्यानंतर भाग्यश्रीने एक मैने प्यार कियाचा किस्सा सांगितला आहे.

हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा ती सलमान खानसोबत या चित्रपटाचे शूटिंग करत होती. भाग्यश्रीला एका गाण्यामध्ये सलमान खानला मिठी मारायची होती. ती का रडली होती आणि त्यानंतरच सलमानने तो सीन शुट करण्यासाठी तिला कसे मनावले होते हे तिने सांगितले आहे.

त्या क्षणाबद्दल खुलासा करताना भाग्यश्री म्हणाली, “त्या वेळी मी फक्त १८ वर्षांची होते. त्यावेळी मी प्रेमात होते आणि माझे लग्न होणार होते, पण मी तोपर्यंत कोणत्याही मुलाला मिठी मारली नव्हती, त्यामुळे मी काळजीत होत. अशात ‘मैने प्यार किया’ मधील गाण्याच्या एका सीनमध्ये मला सलमान खानला मिठी मारावी लागणार होते. हे ऐकून मी रडायलाच लागली होती.

त्यानंतर अर्धा तास सलमान खान आणि सूरज सरांनी मला समजावत होते. कारण त्यांना सुमन आणि प्रेमला एकत्र दाखवायचे होते. सलमान माझ्याकडे आला.त्यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याने मला खूप निरागसतेने विनंती केली की, प्लिज हे करुन घे. त्यामुळे मी नाही म्हणू शकले नाही आणि अशा प्रकारे या मिठीला होकार दिला, असे भाग्यश्रीने म्हटले आहे.

भाग्यश्रीने सलमान आणि सूरज सरांची विनंती समजून घेतली आणि स्वीकारली. त्याच वेळी, एक वेळ अशी आली जेव्हा त्यांना भाग्यश्रीच्या सल्ल्याचे पालन करावे लागले आणि एक क्रम बदलावा लागला. एका दृश्यात सलमान आणि भाग्यश्री यांना एकमेकांना किस करायचे होते. मात्र, भाग्यश्रीच्या संकोचामुळे हा क्रम बदलण्यात आला आणि तो त्यांच्यामध्ये एका काचेने शूट करण्यात आला.

अभिनेत्रीने सांगितले की मी त्या वेळी लग्न करणार होते, त्यामुळे मला किस करण्यास सोयीस्कर वाटत नव्हते. मग सूरज सरांनी कल्पना दिली की या दृश्यादरम्यान आमच्याकडे एक ग्लास असेल, ज्याद्वारे ते दृश्य दाखवले जाईल. अशा प्रकारे त्याने सीन बदण्यास सांगितला, असे काही खुलासे भाग्यश्रीने केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

डिसेंबर महिन्यात सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाझ गिल करणार होते लग्न; हॉटेलही झाले होते बुक
१० रुपये कमवणाऱ्या मजूराच्या मुलाने उभी केली २००० कोटींची कंपनी; फक्त ५० हजारांमध्ये व्यवसाय केला होता सुरु
“आरएसएस आणि तालिबान सारखेच, फक्त आरएसएस तालिबानसारखा शक्तिशाली नाही”


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: