आठ तरुणांशी लग्न करणाऱ्या लुटारु नवरीला होता एड्स; फसवणूक झालेल्या तरुणांना बसला धक्का

September 03, 2021 , 0 Comments

सध्या लग्नानंतर फसवाफसवीच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. असे असताना पंजाबमधून एक अशी घटना समोर आली, ज्याने एकच खळबळ उडाली आहे.  पंजाबच्या पटीयाला जिल्ह्यातल्या लोकांची फसवणूक करणाऱ्या नवरीला एड्स असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे फसवणूक झालेल्या तरुणांना धक्का बसला आहे.

पटियाला पोलिसांनी आठ लग्न करुन सासरच्यांकडील दागदागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार होणाऱ्या नवरीसह चार जणांना अटक केली आहे. त्यानंतर नवरीचा पोलिसांनी एचआयव्ही चाचणी केली होती. पण रिपोर्ट पाहून पोलिसांना धक्का बसला आहे.

आठवडाभरापुर्वी पोलिसांनी नवरीला आणि तिच्यासोबत गुन्ह्यात सामील असणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांनी तरुणीची एचआयव्ही चाचणी केली. तर तिचा एचआयव्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या तरुणांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.

या तरुणीने तरुणींना घेऊन एक टोळी बनवली होती. ही टोळी लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरुणांसोबत लग्न करुन त्यांची फसवणूक करायची. लग्नानंतर ती तरुणी सासरच्या कुटुंबावर आरोप करायची. तसेच घरातून दागिने आणि रक्कम घेऊन फरार व्हायची.

या तरुणीने आतापर्यंत ८ तरुणांची फसणूक केली होती. त्यानंतर ९ व्या तरुणाची फसवणूक करत असताना पोलिसांनी तिला पकडले आहे. आरोपी तरुणी ही हरियाणामधील कैथल जिल्ह्यातील आहे. तिचे वय ३० वर्षे आहे.

तरुणीचा खरा विवाह २०१० मध्ये झाला होता. त्यानंतर तिला तीन मुलेही झाली होती. पण एकेदिवशी तिचा पती बेपत्ता झाला. त्यानंतर २०१६ मध्ये हा फसवणूकीचा धंदा सुरु केला होता.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! बैलगाडा शर्यतींना अखेर परवानगी; उच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निकाल
स्वत:ला शिवभक्त म्हणतो मग पोरींना फसवून लाॅजवर का नेतो? अक्षय बोऱ्हाडेच्या पत्नीने उघड केले कारनामे
विराटची विकेट घेण्यासाठी गुडघ्यातून रक्त येत असतानाही ‘तो’ खेळत राहिला, शेवटी भारताचा निम्मा संघ बाद झाला


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: