करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; राज्यात ऑक्सिजनबाबत गाइडलाइन्स जारी

September 25, 2021 0 Comments

मुंबई: संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी (एलएमओ) अर्थात तरल वैद्यकीय कमी पडू नये यासाठी त्याची साठवणूक करून ठेवण्यासंबंधी राज्य शासनाने उत्पादकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ( Maharashtra ) वाचा: राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, राज्यातील सर्व एलएमओ उत्पादन करणाऱ्या कंपनी आणि प्राणवायू पुनर्भरण करणाऱ्यांनी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत आपल्या क्षमतेच्या ९५ टक्क्यांपर्यंत साठवणूक करावी आणि पुढील आदेश येईपर्यंत साठ्यासंबंधी अटीचे पालन करावे. प्रकल्पामध्ये एलएमओ उत्पादन पूर्ण क्षमतेने केले जात आहे याकडे लक्ष द्यावे व शहानिशा करून घ्यावी, असे निर्देशही सर्व उत्पादकांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये सर्व एलएमओ उत्पादक साठवणूक (दोन्ही, सार्वजनिक आणि खासगी) करीत आहेत तसेच जास्तीत जास्त प्राणवायू साठवणूकीची पातळी टिकून राहील, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी खात्री करून घ्यायची आहे. याबाबत शक्य तेवढ्या लवकर कार्यवाही करावी, असेही यात नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी वाढल्यास अ-वैद्यकीय ऑक्सिजनचा उपयोग योग्य पद्धतीने करावा असे निर्देशही देण्यात आले आहेत. वाचा: महाराष्ट्रामध्ये कोविड -१९ ची दुसरी लाट एप्रिल ते जून २०२१ दरम्यान कायम होती आणि या काळात सात लाख प्रकरणात १८५० मेट्रिक टन ऑक्सिजनाचा उपयोग करण्यात आला. वास्तविकता: हा सर्व वैद्यकीय प्राणवायू महाराष्ट्रामधील उत्पादकांकडूनच उपलब्ध होतो. कोविडची दुसरी लाट चालू असताना असे निदर्शनास आले की, अनेक उत्पादकांकडे नव्हता आणि मागणी पूर्ण करण्यात ते कमी पडत होते. या अनुभवाच्या आधारे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीचा भाग म्हणून पुरेसा मेडिकल ऑक्सिजन उपलब्ध व्हावा या दृष्टीने या उपाययोजना केल्या जात आहेत. सरकारच्या निर्देशांची अंमलबजावणी करताना राज्य पातळीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त काम पाहतील तर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी (महानगरपालिका क्षेत्र वगळून) आणि महानगरपालिका कार्यक्षेत्रात संबंधित महानगरपालिका आयुक्त हे सक्षम अधिकारी म्हणून काम पाहतील तसेच या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या सूचना २४ सप्टेंबर या तारखेने जारी करण्यात आल्या आहेत. आदेशाच्या तारखेपासून या सूचना लागू असतील आणि पुढील आदेश येईपर्यंत अंमलात असतील, असे नमूद करण्यात आले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: