मुलगी बनून तरुणाने डॉक्टरांना फसवलं; लुटलेली रक्कम ऐकून चक्रावून जाल!

September 05, 2021 0 Comments

: दिल्लीतील एका डॉक्टरला यवतमाळ येथून तब्बल दोन कोटी रुपयांना गंडा घालण्यात आल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. सोशल मीडियावरील मैत्रीतून ही फसवणूक करण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. बहिणीच्या अपहरणाचा बनाव करुन हे पैसे उकळण्यात आले. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करुन रक्कम जप्त केली आहे. संदेश अनिल मानकर रा. यवतमाळ असं सोशल मीडियावरील मैत्रीतून गंडा घालणाऱ्या आरोपीचं नाव आहे. घटनेनंतर पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण एक कोटी ७८ लाख सहा हजार १९८ रुपये रोख आणि मुद्देमाल जप्त केला. डॉ. रजत रतीशकुमार मोयल (४४) रा. डी. पॉकेट ए सिद्धार्थ एक्टेंशन दिल्ली असं फसवणूक झालेल्या डॉक्टरचं नाव आहे. संदेश मानकर याने आपण मुलगी असल्याचं भासवून आणि अनन्या ओबेराय रा. यवतमाळ असं नाव सांगून या डॉक्टरची फसवणूक केली. रजत मोयल हे व्यवसायाने डॉक्टर असू त्यांचे फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉटसअ‍ॅपवर अकाउंट आहे. या माध्यमातूनच त्यांची अनन्या ओबेराय उर्फ संदेश मानकर याच्याशी ओळख झाली. त्याचे रुपातंर मैत्रीत झाले. त्यांचा वेळोवेळी सोशल मीडियावर संपर्क सुरू होता. दरम्यान आरोपीने खोटा बनाव रचून फिर्यादीला आपल्या जाळ्यात ओढले. तसंच मोठा उद्योग, हॉटेल आणि नेहमीच परदेशी येणे-जाणे करावे लागते, संपन्न आर्थिक घराण्याशी संबंधित असल्याचे सांगितले. दुबईला लहान बहिणीचे अपरहण झालं आहे, तिला वाचवायचे आहे, दोन कोटीची आवश्यकता आहे, असं खोटे सांगून आरोपीने डॉक्टरकडे रक्कमेची मागणी केली. आरोपीने सांगितलेल्या अपहरण नाट्यावर विश्वास ठेवून दोन कोटी रुपये देण्यासाठी डॉक्टर यवतमाळात आले. दारव्हा रोडवरील एकविरा हॉटेल व बारच्या बाहेर समर नामक व्यक्तीस ही रक्कम १२ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री १० वाजता दिली. त्यानंतर डॉक्टर १३ ऑगस्टला दिल्ली येथे परत गेले. २७ ऑगस्ट रोजी संदेश मानकर याने रजत मोयल यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला. बहिणीची सुटका झाली असून, आम्ही यवतमाळात आहोत आणि माझे बहिणीसाठी खरेदी करत आहोत, आम्हाला पैशाची आवश्यकता आहे, असं म्हणून स्टेट बँक वडगाव शाखेच्या खात्यात चार लाख रुपये टाकण्यास सांगितलं. त्यानुसार डॉ. रजत मोयल यांनी रक्कम जमा केली. त्यानंतर तीन लाख २० हजार रुपये बँक ऑफ बडोदा शाखा मेनलाइन यवतमाळ या खात्यात टाकण्यास सांगितले. मानकर याने सांगितल्यानुसार डॉक्टरांनी पैसे पाठवले. त्यानंतर आरोपीचा मोबाईल बंद झाला आणि पुन्हा पैशाच्या मागणीसाठी संपर्क झाला नाही. तेव्हा डॉ. मोयाल यांना शंका आल्याने त्यांनी चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. डॉ. रजत मोयल तडकाफडकी यवतमाळला आले आणि त्यांनी याबाबत अवधूतवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तसेच पोलिसांना सांगितले की, ते समर नामक व्यक्तीस चेहऱ्याने ओळखतात. डॉ. मोयल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तसेच एसडीपीओ माधुरी बाविस्कर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर प्रकरणातील रक्कम जप्तही करण्यात आली. २४ तासात हनीट्रॅपचा पोलिसांनी केला उलगडा दोन कोटीच्या हनीट्रॅपचा उलगडा यवतमाळ पोलिसांनी अवघ्या काही तासातच केला. डॉ. रजत मोयल रा. दिल्ली यांनी सायबर सेलकडे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर फसवणूक करणारी महिला नसून पुरूष असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार एक पथक गठीत करून अरूणोदय सोसायटीत धडकले. एका घरात धाड टाकून संदेश मानकर याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून एक कोटी ७२ लाख सात हजार रुपये रोख, चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिणे तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल असा एकूण एक कोटी ७८ लाख सहा हजार १९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भूजबळ यांनी पत्रपरिषदेत दिली. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनात, एसडीपीओ माधुरी बाविस्कर, सपोनि अमोल पुरी, सपोनि गजानन करेवाड, कवीश पाळेकर, महंमद भगतवाले, सलमान शेख, किशोर झेंडेकर, पंकज गिरी आदींनी केली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: