डोंबिवली बलात्कार प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर

September 25, 2021 0 Comments

म. टा. वृत्तसेवा, कल्याण डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Dombivli Gangrape) प्रकरणातील चौकशीत आणखी काही धक्कादायक बाबी समोर येत आहेत. मुलीसोबतच्या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपी याने २९ जनेवारी रोजी तिच्या नकळत अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मित्रांच्या साथीने तिला थंडपेयातून नशेची पावडर तर कधी जबरदस्तीने दारू पाजत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. आपल्यावर अन्याय करणाऱ्या सर्व नराधमांची नावे या मुलीने पोलिसांना सांगितली असून, त्याआधारे पोलिसांनी ३३ पैकी २९ जणांना अटक केली आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. शुक्रवारी अटक केलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली तर, उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध भागांत तीन पथके धाडली आहेत. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त सोनाली ढगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष महिला पथक करत आहे. दरम्यान हे सर्व आरोपी नशेबाज असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. विविध राजकीय पक्षांचे आणि संघटनांचे पदाधिकारी मानपाडा पोलिस ठाण्याबाहेर आरोपींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी निदर्शने करत असल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार श्रीकांत शिंदे, भाजप आमदार भारती लवेकर, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी मानपाडा पोलिसांची भेट घेत घटनेची माहिती घेत निष्पक्षपाती चौकशीची मागणी केली. मानपाडा पोलिसांचा थंड कारभार एकादिवशी दहा जणांनी आणि मे महिन्यात एकादिवशी दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत १५ जणांनी या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार पीडीत मुलीने केली आहे. याचदिवशी दिवसभर मुलगी घरी न आल्याने ती हरविल्याची तक्रार तिच्या आईने मानपाडा पोलिसांत केली होती. यानंतर पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असती तर तिच्यावर त्यानंतर चार वेळा झालेल्या सामूहिक अत्याचारातून तिची सुटका झाली असती.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: