१० रुपये कमवणाऱ्या मजूराच्या मुलाने उभी केली २००० कोटींची कंपनी; फक्त ५० हजारांमध्ये व्यवसाय केला होता सुरु

September 05, 2021 , 0 Comments

आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीची गोष्ट सांगत आहोत, ज्याला दोन वेळची भाकर लवकर मिळत नव्हती. पण आज त्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी २००० कोटींची कंपनी तयार केली आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे मुस्तफा पीसी. मुस्तफा पीसी यांचा जन्म केरळमधील एका दुर्गम गावात झाला. त्यांचे वडील रोजंदारीवर काम करणारे व्यकी होते, त्यांना फक्त १० रुपये मजुरी म्हणून मिळायचे. ते सुशिक्षत नव्हते पण त्यांच्यात मुलांना शिकवण्याची जिद्द होती.

मुस्तफा यांनी सोमवारी ह्युमन्स ऑफ बॉम्बे यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले, आम्ही रोज १० रुपये कष्टाने कमवायचो. त्यामुळे आम्ही दिवसातून तीन वेळा जेवण करण्याचा विचारही करू शकत नाही. पण अजूनही मला वाटते जेवण जितके महत्वाचे आहे त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण महत्वाचे कारण ते तुमची परिस्थिती बदलण्यास मदत करते.

मुस्तफा पीसी हे आयडी फ्रेश फूडचे सीईओ आहेत. मुस्तफा पीसी म्हणाले की, एका शिक्षकामुळे त्यांना मोफत अभ्यास करण्याची संधी मिळाली. जेव्हा त्यांना महाविद्यालयात जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या शिक्षकांनी त्यांची फी भरली. चांगल्या पगाराची नोकरी असूनही, मुस्तफा यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात नेहमीच रस होता. मुस्तफा यांनी नंतर आयडी फ्रेश फूडची स्थापना केली. ही कंपनी इडली आणि डोसा बटर बनवते.

मुस्तफा पीसीने सुरुवातीला कंपनीमध्ये ५० हजार रुपये गुंतवले. त्यांनी ५० चौरस फुटांच्या स्वयंपाकघरात ग्राइंडर, मिक्सर आणि वजनाच्या यंत्रासह काम सुरू केले. मुस्तफा म्हणतात, की सुरुवातीला आम्हाला एका दिवसात १०० पॅकेट्स विकण्यास ९ महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागला. अनेक वर्षे कंपनीने खूप संघर्ष केला आणि खूप तोट्याचा सामनाही केला. एक काळ असा होता जेव्हा ते आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकत नव्हते.

आता हिच आयडी फ्रेश फूड कंपनी २ हजार कोटी रुपयांची कंपनी बनली आहे. यापूर्वी केवळ ५ हजार किलो तांदळापासून १५ हजार किलो इडली मिश्रण तयार केले जात होते आणि आज कंपनी शेकडो फूड स्टोअर्स आणि मेट्रो शहरांमध्ये मिश्रणापेक्षा चारपट जास्त इडली विकत आहे. तसेच या कंपनीने हजारो तरुणांना रोजगाराची संधीही उपलब्ध करुन दिली आहे.

मुस्तफा यांना देशात नाश्त्याचा राजा म्हणून ओळखले जाते. २०१५-१६ मध्ये ज्यांची वार्षिक उलाढाल सुमारे १०० कोटी होती. २०१७-१८ मध्ये हे वाढून १८२ कोटी रुपये झाले. आता या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर ७३० कोटी इतका आहे. सध्या कंपनीची किंमत २ हजार कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या २५ कर्मचाऱ्यांना करोडपती बनवले आहे

महत्वाच्या बातम्या-

बाबो! तब्बल ‘इतक्या’ एकरच्या सरकारी बंगल्यात राहतात पंतप्रधान मोदी; जाणून पंतप्रधानांना काय-काय मिळतात सुविधा
तेव्हा सलमानला मिठीच मारायची हिंमत होत नव्हती, कारण…; भाग्यश्रीने सांगितला मैंने प्यार कियामधला ‘तो’ किस्सा
आम्हाला आमची बिस्कीटच विकायची नाहीत; पारले बिस्कीटच्या विरोधात सरकारकडे तक्रार


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: