खुल्लमखुल्ला प्यार करेंगे हम दोनो! सायली कांबळेने दिली प्रेमाची कबुली ‘या’ व्यक्तीला करतेय डेट

September 24, 2021 , 0 Comments

मुंबई। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘इंडियन आयडॉल’ मधील प्रत्येक स्पर्धक हा कायम चर्चेत असतो. अशातच मागील महिन्यात या शोचा 12 सिझन पार पडला आहे. या शोमधील पवनदीप तसेच मराठमोळी गायिका सायली कांबळे ही जरी सिझन संपला तरी कायम चर्चेत असते.

सायली कांबळे ही जरी या शोची विजेती नसली तरी शोमधून बाहेर पडताच सायलीकडे अनेक मराठी गाणी गाण्याच्या ऑफर येऊ लागल्या. त्यामुळे सायली ही कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच आता सायलीच्या खाजगी आयुष्याबद्दल चाहत्यांसाठी सुखद माहिती समोर येत आहे.

सायली कांबळे हिने अखेर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. शोमध्ये असताना निहालसोबत तिचे नाव जोडले गेले. मात्र, हे सर्व खोटं असून सायलीने निहालसोबतच्या चर्चांना आता पूर्णविराम दिलाय व आयुष्याच्या साथीदारासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.

हा फोटो इंन्स्टाग्राम अकाऊंटवर सायलीने शेअर केला आहे. या फोटोमध्ये सायली व तिचा जोडीदार दिसत आहे. दोघंही कॅमेराकडे पाहत पोझ देताना फोटोत दिसत आहेत. यावेळी सायली आणि तिच्या बॉयफ्रेंडचा रोमॅण्टिक अंदाज पाहायला मिळतोय.

तसेच या फोटोला ‘आज मला हे स्पष्टपणे सांगायचंय की.. बस्स… माझं तुझ्यावर प्रेम आहे’ असं कॅप्शन देखील दिल आहे. फोटोमध्ये असलेल्या म्हणजे सायलीच्या बॉयफ्रेंड नाव धवल अस आहे. सायली धवलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट झालंय. या पोस्टद्वारे तिने धवलसोबतच्या नात्याला कबुली दिली आहे.

त्यामुळे अनेजण या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी तर नाराजी व्यक्त केलीय तर काहींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तिची ही पोस्ट अवघ्या काही मिनिटातच व्हायरल झालीय. व आता सर्वत्र सायली व धावलच्या नात्याबद्दल चर्चा रंगल्या आहेत.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: