सांगली: जत शहरात भरदिवसा घडलेल्या 'या' घटनेने सगळेच हादरले
सांगली: शहरात गजबजलेल्या परिसरात महाराष्ट्र बँकेच्या समोरून अज्ञात दोघा चोरट्यांनी चारचाकीमध्ये ठेवलेली तीन लाख ७० हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली. चोरीच्या घटनेनंतर चोरट्यांनी धूम स्टाइलने दुचाकीवरून धूम ठोकली. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे जत शहरातील नागरिकांसह व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. ( ) वाचा: घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील सिद्धनाथ येथील हे आज दुपारी त्यांच्या चारचाकी गाडीतून ( एमएच १० बीएम-९९१२) जत शहराच्या मध्यभागी असलेल्या गांधी चौकातील येथे पैसे काढण्यासाठी गेले होते. तीनच्या सुमारास बँकेतून त्यांनी तीन लाख ७० हजार रुपये काढले. यानंतर काढलेले पैसे घेऊन त्यांनी त्यांच्या चारचाकी गाडीच्या सीटवर ठेवले. त्याचवेळी त्याना आपल्या चार चाकी गाडीतील पुढील एका चाकातील हवा पूर्णपणे गेल्याचे दिसले. चाकातील हवा कशी गेली, हे पहात असतानाच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कारचा दरवाजा उघडून सीटवर ठेवलेली पैशांची बॅग लांबवली. चोरीचा प्रकार लक्षात येताच संभाजी चौगुले यांनी आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत चोरटे रोडच्या दिशेने भरधाव वेगाने निघून गेले. वाचा: याबाबत चौगुले यांनी ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी बँकेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, दोन्ही चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शहरात नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. दरम्यान, भरदिवसा घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: