तुरूंगातून बाहेर येताचं अभिनेत्रीचा हटके अंदाज; फोटो व्हायरल होताच रंगल्या चर्चा

September 02, 2021 , 0 Comments

मुंबई। बांग्लादेशची प्रसिद्ध अभिनेत्री पोरी मोनी ही 26 दिवसांच्या तुरुंगवासानंतर बाहेर आली आहे. पोरी मोनी हिच्या घरात 30 परदेशी दारूच्या बाटल्या सापडल्या होत्या व त्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले होते. व आता पोरी मोनीला ढाका महानगर सत्र न्यायालयाने 42 हजार 700 रूपये जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.

मात्र तुरुंगातून बाहेर निघताच अभिनेत्रीचा भलताच स्वॅग पाहायला मिळाला आहे. पोरी मोनी तुरुंगातून सोडताच तिच्या भोवताली चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. याचे फोटोज देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पोरी मोनी या अभिनेत्रीचं खरं नाव अभिनेत्री शमसुन्नहर स्मृती आहे मात्र ती पोरी मोनी या नावाने ओळखली जाते. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेत्रीच्या गाडीच्या भोवती चाहत्यांनी तुडुंब गर्दी केली आहे. यावेळी चाहत्यांनी तिच्यासोबत फोटो देखील काढले. ती आपल्या गाडीवरून जात आहे.

व आजुबाजुला चाहत्यांनी तिला घेरलं आहे. 4 ऑगस्टला पोरी मोनी हिच्या घरावर रॅपिड ऍक्शन बटालियनने (आरएबी) छापा टाकला होता. व यावेळी पोरी मोनीच्या घरातून आरएबीच्या टीमने 30 परदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. व त्यानंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

मात्र त्यावेळी पोरी मोनीने अनेक आरोप केले होते. पोरी मोनी म्हणाली, साध्या वेशातील काही लोक माझ्या घरात येण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात, तेव्हा त्यांनी पोलीस असल्याचं सांगितलं. नंतर त्यांनी गेट तोडून माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला.

मी पोलीस स्टेशनला फोन केला, पण माझ्या घरी कोणी आले नाही. मला माझ्या जीवाची भीती वाटत आहे. असं ती म्हणाली होती. त्याआधीही तिने ढाक्याच्या एका व्यवसायिकावर बलात्कार आणि मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता व त्यावेळी ती चर्चेत आली होती. व आता पुन्हा ती चर्चेत आली आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: