बालिकेचा हात धरून प्रपोज केले होते; कोर्टाने दिली 'ही' कठोर शिक्षा
कोल्हापूर: बालिकेवरील प्रकरणी ए. एस. महात्मे यांनी आरोपी धनाजी विश्वास कोळी (वय २५ रा. लाटवडे, ता. हातकणंगले) याला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि वीस हजार रुपये दंड ठोठावला. ( ) वाचा: आरोपी धनाजी कोळी हा विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर चालक म्हणून काम करत होता. एका बालिकेशी त्याने ओळख वाढवली. त्यानंतर ती शाळेला ये जा करताना मोटार सायकवरून तो तिचा पाठलाग करायचा. बालिका अल्पवयीन आहे हे माहीत असून १७ फेब्रुवारी २०१८ रोजी वेळोवेळी वाईट हेतून वडगाव ते नागावपर्यंत मोटार सायकलवरून त्याने तिचा पाठलाग केला. तसेच आरोपीने बालिकेचा हात धरून माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यानंतर बालिकेच्या पालकांनी ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. वाचा: या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उप विभागीय अधिकारी यांनी केला. त्यानंतर आरोपीविरुद्ध कोर्टात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी आठ साक्षीदार तपासले. पीडित मुलगी आणि इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. साक्षीदारांचे जबाब आणि सरकारी वकील कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून कोर्टाने आरोपी कोळी यास चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि वीस हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: