ईडीचा असा गैरवापर कधीच झाला नाही!; पवारांनी केला 'हा' गंभीर आरोप

September 05, 2021 0 Comments

पुणे: राज्यातील महाविकास आघाडीचे अनेक नेते सध्या सक्तवसुली संचालनालयाच्या () चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी आज पुणे येथे माध्यमांशी बोलताना यावर थेट शब्दांत टीका केली. 'हा गैरप्रकार महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाही तर अन्य राज्यांत देखील हे चालले आहे', असे म्हणत शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केले. ( ) वाचा: राज्याचे माजी गृहमंत्री , राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची गेल्या काही काळापासून सुरू आहे. देशमुख प्रकरणात आता परिवहन मंत्री अनिल परब यांनाही चौकशीसाठी बोलावले गेले आहे. या सगळ्याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी ईडी या तपास यंत्रणेचा वापर होत असल्याचाच थेट आरोप केला. वाचा: 'देशात ईडी या तपास यंत्रणेचा आजवर अशाप्रकारे कधीच वापर केला गेला नाही. हल्लीचं सरकार विरोधकांना नमवण्यासाठी या यंत्रणेचा वापर करण्याची भूमिका घेताना दिसत आहे. हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर अन्य राज्यातही चाललं आहे', असे शरद पवार म्हणाले. आपण फक्त महाराष्ट्रातील आपल्याला माहीत असलेल्या लोकांची चर्चा करत आहोत पण हा गैरप्रकार महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश यासह दक्षिणेतील काही राज्यांमध्येही सुरू आहे, असेही पवार पुढे म्हणाले. दरम्यान, शरद पवार यांनी याआधीही अशाप्रकारचा आरोप केलेला आहे. आणि ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांचा सरकारकडून विरोधकांविरुद्ध वापर केला जात असल्याचे ते सातत्याने बोलत आले आहे. ईडीने शरद पवार यांना नोटीस धाडली होती. तेव्हाही पवार यांनी थेट शब्दांत आव्हान दिले होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: