मोदी सरकारने जे केले आहे, ते कोणताही देश करु शकला नाही; सर्वोच्च न्यायालयाने केले मोदी सरकारचे कौतूक

September 25, 2021 , 0 Comments

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले होते. या कोरोना काळात अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे कोरोना मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५० हजारांची मदत करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

कोरोना रुग्णांच्या कुटुंबियांना ५० हजारांची मदत मोदी सरकारने जाहीर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मोदी सराकारचे कौतूक केले आहे. भारताने जे केले आहे, ते इतर कुठलाही देश करु शकलेला नाही याची न्यायिक नोंद घेणे आपल्याला आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

तसेच अनेक कुटुंबांचे अश्रू पुसण्यासाठी काहीतरी करण्यात आले, याचा आम्हाला खुप आनंद आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. २२ सप्टेंबरला मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत मदतीचे जाहीर केले होते.

गेलेले जीव आपण परत आणू शकत नाही, मात्र ज्यांना भोगावे लागले आहे. अशा कुटुंबासाठी देश जे काही करु शकतो ते करण्यात आले आहे, असे केंद्राची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले आहे.

या संदर्भातील निर्देशांसह ४ ऑक्टोबरला आदेश जारी करु, असे केंद्र सरकारने सादर केलेल्या दोन शपथपत्रांची नोंद घेणाऱ्या न्या. एम.आर. शहा व न्या. ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने सांगितले आहे.

तसेच मृत्यु प्रमाणपत्र जारी करण्याबाबत काही वाद उद्भवल्यास, मृताचा हॉस्पिटल रेकॉर्ड मागवण्याचा अधिकार जिल्हा स्तरावरील तंटा निवारण समित्यांना दिला जाईल, असेही खंडपीठाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तान जगातील सर्वात जास्त सुरक्षित देश आहे – वकार युनूस
VIDEO: तरुणाने घेतली ३५ फुट उंच असलेल्या होर्डिंगवरुन उडी, पुण्यातील धक्कादायक घटना
मोठी बातमी! नवरात्रीपासून राज्यातील सर्व मंदिरं उघडणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: