मुख्यमंत्र्यांसमोरच सरनाईक म्हणाले, मी सर्वांना ऑक्सिजन देतो, पण...

September 01, 2021 0 Comments

ठाणे: मिशन ऑक्सिजन अंतर्गत ठाणे शहरासाठी कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण आज मुख्यमंत्री यांनी केले. आमदार यांनी या प्लांटची उभारणी केली आहे. या कार्यक्रमात बोलताना सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच नेते व खासदार यांचे जाहीरपणे आभार मानले. सरनाईक हे ईडी चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. त्यातूनच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी जुळवून घेण्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या संपूर्ण संकटाच्या काळात संजय राऊत हे सातत्याने सरनाईक यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. ईडीच्या कारवाईवर त्यांनी परखडपणे आपली मते मांडली आहेत. त्यातूनच सरनाईक यांनी राऊत यांचे आभार मानताना ऑक्सिजनचाच दाखला दिला. ( ) वाचा: ऑक्सिजन प्लांटच्या ऑनलाइन लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे आभार मानले आणि त्यानंतर संजय राऊत यांना खास धन्यवाद दिले. 'मी सर्वांना ऑक्सिजन देतो पण मला ऑक्सिजन देण्याचे काम संजय राऊत करतात. आता ते दुसऱ्यांनाही ऑक्सिजन देत आहेत. यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो', असे प्रताप सरनाईक म्हणाले. त्यानंतर राऊत यांनीही सरनाईक यांच्या कामाचे कौतुक केले. असतील, प्रताप सरनाईक असतील यांनी करोना संकटाच्या काळात चांगले काम केले आहे. तुम्ही पुण्य कमावले आहे. संकटाच्या काळात हेच पुण्य कामाला येईल, असे राऊत यांनी नमूद केले. दहीहंडी सणावर करोनामुळे निर्बंध लावले असताना काही राजकीय पक्ष त्याचे पालन करत नाहीत. हट्टाने दहीहंडी रस्त्यावर साजरी केली जात आहे. ते यातून करोनाला आमंत्रण देत असून त्यांना या ऑक्सिजनची गरज लागेल, असा टोलाही राऊत यांनी लगावला. वाचा: दहीहंडीऐवजी आरोग्य उत्सव करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गोकुळअष्टमी साधेपणाने साजरी करा व दहीहंडी ऐवजी आरोग्य उत्सव साजरा करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्या आवाहनला प्रतिसाद देत संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता आरोग्य उत्सव आयोजित करण्यात आला. त्याचाच भाग म्हणून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दोन ऑक्सिजन प्रकल्पांची उभारणी करण्यात आली. त्यापैकी पहिल्या मीरा भाईंदर येथील प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते तर आज ठाणे शहरातील दुसऱ्या प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्याहस्ते झाले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व ठाण्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: