VIDEO: आनंद महिंद्रानी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये झाली मोठी चुक; नंतर चूक सावरत म्हणाले

August 28, 2021 , 0 Comments

सोशल मीडियावर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा खुप ऍक्टिव्ह असतात. ते वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. आताही ते एक व्हिडिओ त्यांनी प्रचंड आवडला असून त्यांनी तो व्हिडिओ शेअर केला आहे.

आनंद महिंद्रांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंवरुन कलारिपयट्टूचा सराव करणाऱ्या एका मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पण अशात आनंद्र महिंद्रांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये एक मोठी चुक केली आहे.

नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ बघून खूप आनंद घेतला आहे, पण आनंद महिंद्रांनी या व्हिडिओमध्ये चुकून मुलगा ऐवजी मुलगी लिहिले आहे. त्यांनी केरळमधील एकवीरा कलारीपयट्टू अकादमीचा विद्यार्थी नीलकंदन नायर या मुलाचे कौतुक केले आहे. यावेळी निलकंदनने आनंद महिंद्रांच्या पोस्टला उत्तर देताना आपली चूक सुधारली आणि म्हटलं आहे की, मी मुलगी नाही. मी १० वर्षांचा मुलगा आहे.

आनंद महिंद्राने शेअर केलेल्या या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना या कलेविषयी माहिती असणे आवश्यक आहे. कलारीपयट्टू हा एक प्राचीन मार्शल आर्ट फॉर्म आहे. केरळमध्ये या कलेचा उगम झाला होता. कलारीपयट्टूला कलारी म्हणूनही ओळखले जाते.

कलारीपयट्टू हे प्राचीन युद्धक्षेत्रांसाठी डिझाइन केले गेले होते जे भारतासाठी अद्वितीय आहे, जसे की खंजीर, काठ्या आणि तलवारी. व्हिडिओमध्ये, नीलकंदन नायर लांब काठी वापरून सहजतेने कलारीपयट्टूचा सराव करताना दिसत आहे.

मार्शल आर्ट फॉर्मबद्दल बोलताना आनंद महिंद्रा म्हणाले, क्रीडा प्राधान्यांमध्ये कलारिपयट्टूला मोठ्या प्रमाणात प्रकाशझोतात आणण्याची गरज आहे. हे जगाचे लक्ष वेधून घेऊ शकते. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओला ३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी बघितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

नारायण राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाखांचे बक्षिस देण्यात येईल; हिंदू सेनेच्या अध्यक्षांचे वादग्रस्त वक्तव्य
अरेरावी करत हात उगारणाऱ्या महीलेला दुकानदाराने दांडक्याने चोप चोप चोपले; पहा व्हिडीओ
भीषण अपघात! कारवर कोसळलं नौदलाचं हेलिकॉप्टर; व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: