coronavirus in maharashtra updates: आज राज्याला मोठा दिलासा; दैनंदिन करोना बाधित रुग्णसंख्येत घट, पण...
मुंबई: आज करोनाच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली असून राज्याला दिलासा मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ५ हजार ५३९ नव्या बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. या बरोबरच आज एकूण ५ हजार ८५९ इतके रुग्ण बरे झाले आहेत. आज दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली असली तरी मृत्यूंची संख्या चिंता कायम राखणारी आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आज दिवसभरात एकूण १८७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra registered 5539 new cases in a day with 5859 patients recovered and 187 deaths today) आज राज्यात झालेल्या १८७ रुग्णांच्या मृत्यूंनंतरही मृत्यूदर मात्र गेल्या काही दिवसांपासून २.०१ टक्क्यांवरच स्थिरावला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ३० हजार १३७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ टक्क्यांवरच स्थिरावले आहे. क्लिक करा आणि वाचा- पाहा, कोणत्या जिल्ह्यात किती सक्रिय रुग्ण! राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७४ हजार ४८३ इतकी आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १४ हजार ८३४ इतका आहे. त्या खालोखाल सांगलीत एकूण ७ हजार ६३७ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. तर, साताऱ्यात ही संख्या ७ हजार ७८३ इतकी आहे. ठाणे जिल्ह्यात ६ हजार १६२ सक्रिय रुग्ण आहेत. या खालोखाल अहमदनगरमध्ये एकूण ६ हजार ०२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर सोलापुरात ५ हजार ३२० इतके रुग्ण आहेत. क्लिक करा आणि वाचा- मुंबईत ५१४७ सक्रिय रुग्ण मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार १४७ इतकी आहे. तर, रायगडमध्ये २ हजार २५४, रत्नागिरीत १ हजार ९२८, सिंधुदुर्गात १ हजार ७०१, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १ हजार ७९३ इतकी झाली आहे. बीडमध्ये १ हजार ८४६, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ००४ इतकी आहे. नंदूरबारमध्ये फक्त १० सक्रिय रुग्ण या बरोबरच, औरंगाबादमध्ये ६८८, नांदेडमध्ये ही संख्या ४४७ इतकी आहे. जळगावमध्ये ३१५, तसेच अमरावतीत ही संख्या ९० इतकी आहे. तर यवतमाळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ११८ इतकी झाली आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या नंदूरबार जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १० वर आली आहे. क्लिक करा आणि वाचा- ४,३५,५१६ व्यक्ती होम क्वारंटाइन आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ९१ लाख ७२ हजार ५३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ४१ हजार ७५९ (१२.९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ३५ हजार ५१६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ८३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: