अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या; ईडीच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे

August 12, 2021 0 Comments

मुंबई: चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. खासगी बँकांकडून देशमुख यांनी घेतलेल्या कर्जाबाबत ईडीच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले असून तपासाची व्याप्ती वाढवत त्याअनुषंगानेही ईडीने चौकशी सुरू केली आहे, असे ईडीतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. ( ) वाचा: बडतर्फ पोलीस अधिकारी याच्याकरवी अनिल देशमुख हे पैसे वसुली करत होते व वाझेला दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट देण्यात आले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी केला आहे. याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या आदेशावरून सीबीआय आणि ईडी मार्फत चौकशी सुरू आहे. यात देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी ईडीने छापेमारीही केली आहे. तपासात देशमुख यांच्याकडून सहकार्य केले जात नसल्याचा आरोपही ईडीकडून कोर्टात करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ईडीने नवीन धागेदोरे हाती लागल्यानंतर तपासाची व्याप्ती वाढवली आहे. वाचा: अनिल देशमुख यांनी काही खासगी बँकांकडून कर्ज घेतले आहे आणि हे कर्ज मंजूर करताना नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे काही पुरावे ईडीच्या हाती लागले असून त्याअनुषंगाने तपास सुरू करण्यात आल्याचे ईडीतील सूत्रांनी नमूद केले. कर्ज मंजुरीत नियमांचे उल्लंघन झाले असेल तर त्यात नेमकी कोणत्या अधिकाऱ्यांनी देशमुख यांना मदत केली, याचाही तपास ईडीचे अधिकारी करत आहेत. ही कर्जाची रक्कम देशमुख यांच्या कुटुंबीयांची मालकी असलेल्या कंपन्यांच्या खात्यात जमा झाली आहे. यातील काही कंपन्या केवळ कागदोपत्री आहेत, असेही ईडीतील सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. १०० कोटी रुपये वसुली प्रकरणात पालांडे तसेच कुंदन शिंदे हे दोघे अटकेत असून सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: