२४ तासांच्या आत अनिल परबांवर गुन्हा दाखल करा, नाहीतर… ; भाजप आमदाराचा रत्नागिरी पोलिसांना इशारा

August 26, 2021 , 0 Comments

मंगळवारी दिवसभर राज्याच्या राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्यांना संगमेश्वर पोलिसांनी अटक केली होती.

त्यानंतर नारायण राणे यांना घेऊन पोलिस महाड येथे दाखल झाले होते. रात्री उशिरा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला होता. पण आता या प्रकणाला वेगळेच वळण लागताना दिसत आहे. कारण एका भाजप नेत्याने रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर आपल्या आक्रमक ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र आता त्यांनी ट्विट करुन केलेल्या मागणीमुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच आपली मागणी पुर्ण न झाल्यास आपण न्यायालयाकडे जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.मरा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अन्याय्य अटकेप्रकरणी रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीरपणे रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांवर दबाव आणला होता, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

तसेच अटकेप्रकरणी जी कायदेशीर प्रक्रिया पार पडायला हवी होती, ती पार पडली नाही. आपल्या पदाचा गैरवापर केला आणि परब यांनी मंत्री असताना व्यवस्थापनात हस्तक्षेप केला, अडथळा आणला. त्यामुळे त्यांच्याविरोधात २४ तासांच्या आत एफआयआर दाखल करावा, अशी मागणी मी रत्नागिरीच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे ईमेलद्वारे पत्र पाठवून केली आहे, जर एफआयआर दाखल झाला नाही, तर आम्ही न्यायालयात दाद मागू, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश कोणी दिले होती अशी चर्चा सध्या सुरु आहे. असे असतानाच अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते पोलिसांशी अटकेबाबत बोलताना दिसत होते. त्यामुळे भाजपने आता अनिल परब यांच्याविरोधातही आक्रमक भुमिका घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-

केवळ ७८ धावांमध्ये भारतीय संघ तंबूत, इंग्लंडच्या संघासमोर भारतीय संघाची केविलवाणी अवस्था
सासूच्या आरोपांमुळे वैतागली सून; सिद्ध करण्यासाठी सूनेने जे केलं ते पाहून परीसरातील नागरीकही झाले हैराण
लग्नापुर्वी हुशार वाटणारा नवरा, नंतर भलताच मुर्ख वाटायला लागतो; मराठमोळ्या महिलेची भन्नाट कविता व्हायरल


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: