मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून सुरू होणार लोकल, वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री..
मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. गेले एक ते दीड वर्षांपासून बंद असलेला लोकल प्रवास मुंबईकरांसाठी सुरु करणार का किंवा रक्षाबंधन तसेच गणेशउत्सव सण जवळ येत असल्याने निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून होत्या.
अशाच अनेक मुद्दयावरून आज उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम आपल्या देशाला यशाच्या शिखरावर पोहचवलेल्या टोकियो ऑलम्पिक खेळाडूंचे अभिनंदन तसेच कौतुक केले. सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रानं यश मिळवून देशाची मान उंचावली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच कोरोनाचं संकट अजूनही संपलं नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे. तर कोरोना काळात नैसर्गिक आपत्ती आल्यानं पावसामुळे अनेक गावांना फटका बसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अतिवृष्टीच्या काळात प्रशासनानं केलेल्या कामगिरीचं कौतूक उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
मी कोणतेही पॅकेजची घोषणा करणार नाही पण मी कोणाला वाऱ्यावर सोडणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यामुळे ते पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, अजूनही कोरोनाचं संकट संपलेलं नाही. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही सणांवर कोरोनाच सावट आहे.
त्यामुळे राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवल्याचे व कोरोना नियमांचे पालन करणे महत्वाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यावरुन सुद्धा उद्धव ठाकरे यांनी विधान केले आहे. आरक्षण देण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे. त्याचसोबत आरक्षणाचा अधिकार राज्याला द्यावा अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाल्याचे ही त्यांनी लाईव्हच्या वेळी म्हटले आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा कोल्हापूर या भागात कोरोना संदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच उद्यापासून काही ठिकाणी निर्बंध थिशिल केले जात आहेत. त्याचसोबत गर्दी टाळणे हे सुद्धा फार महत्वाचे आहे. रेस्टॉरंट, मॉल्स, प्रार्थनास्थळ याबद्दलचा निर्णय पुढील 8-10 दिवसात घेतला जाईल. या संदर्भात उद्या टास्क फोर्स सोबत बैठक घेतली जाणार असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
तसेच सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई लोकलबाबत नागरिकांना दिलासा दिला आहे. मुंबईतील लोकल प्रवास येत्या 15 ऑगस्ट पासून मुंबईकरांसाठी सुरु होणार आहे. मात्र पहिल्या टप्प्यात लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना मुभा असणार आहे. लोकलबद्दलच्या प्रवासाठी एका अॅपवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर नागरिकांना एक पास दिला जाणार आहे.
त्याचसोबत त्यांच्याकडे फोन नाही त्यांना पास घेण्यासाठी महापालिकेच्या विभागात ते उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. तर सणासुदीचे दिवस ही सुरु होणार असल्याने नियमांचे पालन करणे ही अत्यावश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: